News Flash

IPL २०२१ : दिल्लीतील सामने थांबवावेत, उच्च न्यायालयात याचिका दाखल

IPLच्या १४व्या हंगामावर करोनाचे सावट

आयपीएल २०२१

देशात सध्या करोनाच्या सावटाखाली आयपीएलचा १४वा हंगाम खेळवण्यात येत आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत ही स्पर्धा योग्य आहे का, या विधानावर अनेकांनी विविध मते दिली आहेत. आज सोमवारी कोलकाता वि. बंगळुरू सामना होणार होता. मात्र. कोलकाताचे दोन खेळाडू करोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे सामना स्थगित करण्यात आला. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये काम करणाऱ्या ५ मैदान कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याने या स्पर्धेच्या भविष्याबाबत मोठी शंका निर्माण झाली आहे. अशातच, दिल्लीतील आयपीएल सामने थांबवावे, यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे.

न्यायमूर्ती प्रतिभा एम. सिंह यांना याचिकेच्या सुनावणीसाठी सूचीबद्ध केले गेले आहे. न्यायमुर्ती म्हणाल्या, ”ही एक जनहित याचिका आहे. वकील करण एस. ठुकराल यांनी ही याचिका दाखल केली आहे. शहरातील रुग्णालयांमध्ये बेड, ऑक्सिजन, अत्यावश्यक औषधे नसताना आणि लोक आपल्या प्रियजनांचा अंत्यसंस्कार करताना दिल्लीत आयपीएल सामने खेळणे “अनुचित” आहे का?, असे ठुकराल यांनी याचिकेत म्हटले आहे.

सध्याच्या परिस्थितीत दिल्लीतील आयपीएल सामने रद्द करून स्टेडियम लोकांना कोविड केअर सेंटर म्हणून देण्यात यावे, अशी विनंती ठुकराल यांनी केली आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर २८ एप्रिल रोजी आयपीएलचा एक सामना झाला असून ८ मे रोजी एक सामना होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2021 11:50 pm

Web Title: plea filed in delhi high court to stop ipl 2021 matches adn 96 2
Next Stories
1 पॅट कमिन्सने पंतप्रधान सहायता निधीला देणगी देण्याचा निर्णय बदलला!
2 IPL २०२१ बंद होणार? BCCIच्या अधिकाऱ्यानं दिलं ‘हे’ उत्तर
3 IPL २०२१ : दिल्लीच्या मैदानात काम करणाऱ्या ५ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण
Just Now!
X