करोनाच्या भीतीपोटी सध्या जगभरातील बहुतांश देशात लॉकडाउन सुरू आहे. भारतातील लोकप्रिय IPL स्पर्धादेखील अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व क्रिकेटपटू सध्या आपापल्या घरीच आहेत. काही लोक पूर्णपणे आराम करत आहेत. काही क्रिकेटपटू लाइव्ह चॅटमध्ये व्यस्त आहेत. काही क्रिकेटपटू टिकटॉक आणि इतर प्रकारचे व्हिडीओ तयार करून स्वत:चे आणि चाहत्यांचे मनोरंजन करत आहेत. या दरम्यान, जुने फोटो पोस्ट करण्याचा एक ट्रेंड सोशल मीडियावर आला आहे.

क्रीडाक्षेत्रात खळबळ! दक्षिण आफ्रिकन क्रिकेटपटूला Coronavirus ची लागण

आधी इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू रवी बोपारा याने स्वत:चा लहानपणीचा फोटो पोस्ट केला होता, नंतर चेन्नई सुपर किंग्जने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून काही भारतीय क्रिकेटर्स एकत्र असलेला एक जुना फोटो शेअर केला होता. आता भारताचा माजी क्रिकेटपटू प्रवीण कुमार याने एक जुना फोटो पोस्ट केला आहे. त्या फोटोमध्ये प्रवीण कुमार, सुरेश रैना आणि रोहित शर्मा हे तिघे जण दात दाखवून हसत आहेत. त्या फोटोला प्रवीण कुमारने ‘ते दिवस…. तुम्हां दोघांना काय वाटतं त्या दिवसांबद्दल असं’ कॅप्शन दिलं असून सुरेश रैना आणि रोहित शर्मा यांना टॅग केलं आहे.

या फोटोवर सुरेश रैना आणि रोहित शर्मा या दोघांनीही झकास उत्तरं दिली आहेत. ‘भावा, तो सामना खरंच खूप मस्त झाला होता. मला अजूनही तुझा भेदक मारा आठवतोय. तू आउटस्विंगर टाकून दिलशानचा त्रिफळा उडवला होतास. सुरक्षित राहा’, असं ट्विट रैनाने उत्तरादाखल केलं.

रोहितनेदेखील त्या फोटोवर रिप्लाय केला. ‘(आपला) विचित्र फोटो! त्या दिवसांत आपण खरंच खूप मजा केली रे’, असं ट्विट रोहितने केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रवीण कुमारचा हा फोटो चाहत्यांच्याही पसंतीस उतरला. अनेकांनी त्या फोटोवर कमेंट केली. महत्त्वाचे म्हणजे त्या फोटोला काही तासांतच हजारो लाइक्स मिळाले होते.