12 August 2020

News Flash

Pro Kabaddi 7 : बंगळुरुच्या पवनचा धडाकेबाज खेळ, चढाईत तब्बल ३९ गुणांची कमाई

प्रदीप नरवालचा विक्रम पवनच्या नावावर जमा

प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामात बंगळुरु बुल्सच्या पवन शेरावतने धडाकेबाज खेळी करत अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. बंगळुरुने हरयाणा स्टिलर्सवर ५९-३६ ने मात केली. पवनने या सामन्यात चढाईमध्ये तब्बल ३९ गुणांची कमाई केली. या कामगिरीसह पवन प्रो-कबड्डीच्या इतिहासात चढाईमध्ये सर्वाधिक गुण कमावणारा खेळाडू ठरला आहे.

पवनने पाटणा पायरेट्सच्या प्रदीप नरवालच्या नावे असलेला विक्रम मोडला आहे. प्रदीपने एका सामन्याच चढाईमध्ये ३४ गुणांची कमाई केली होती. या विजयासह गतविजेत्या बंगळुरु बुल्सने सातव्या हंगामातील प्ले-ऑफच्या सामन्यांसाठी आपलं स्थान पक्क केलं आहे. आतापर्यंत ५ संघांनी प्ले-ऑफमध्ये आपली जागा पक्की केली असून, सहाव्या स्थानासाठी यूपी योद्धा आणि जयपूर पिंक पँथर्स यांच्यात लढाई असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2019 8:28 am

Web Title: pro kabaddi season 7 pawan sehrawats record breaking raiding helps bengaluru bulls crush haryana steelers psd 91
Next Stories
1 मुंबईतील ‘एनबीए’ सामन्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद
2 लोढा समितीच्या शिफारशी कौटुंबिक वर्चस्वापुढे निरुत्तर!
3 मेरी कोमवर भारताची भिस्त
Just Now!
X