News Flash

बार्सिलोना ओपन : राफेल नदालचे १२वे विजेतेपद

अंतिम सामन्यात सितसिपासला हरवले

जागतिक क्रमवारीत दुसर्‍या स्थानी असलेल्या स्पेनच्या ोमराफेल नदालने स्टीफनोस सितसिपासला ६-४, ६-७(६), ७-५ असे पराभूत करत १२व्यांदा बार्सिलोना ओपन स्पर्धा जिंकली आहे. एका वृत्तानुसार नदालने इल्या इवाश्का, केई निशिकोरी, कॅमेरून नॉरी आणि पाब्लो कॅरेनो बुस्टा अगुट यांचा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती.

 

यापूर्वी नदालने २०१८मध्ये बार्सिलोना ओपनच्या अंतिम सामन्यातही सितसिपासला हरवून विजेतेपद जिंकले होते. विजयानंतर नदाल म्हणाला, “हे जेतेपद माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. एका वर्षानंतर घरातील प्रेक्षकांसमोर खेळणे ही एक सुखद अनुभूती आहे. स्टीफनोस चांगला प्रतिस्पर्धी आहे. अंतिम फेरी खूप कठीण होती.”

 

२० वेळा ग्रँडस्लॅम विजेत्या नदालच्या कारकीर्दीचे हे ८७वे विजेते आहे. गेल्या वर्षी फ्रेंच ओपन स्पर्धेचे जेतेपद मिळवल्यानंतर हे त्याचे यंदाचे पहिलेच विजेतेपद आहे. एटीपी ५०० स्पर्धेचे विजेतेपद जिंकल्यानंतर नदाल एकमेव खेळाडू आहे ज्याने १२ किंवा अधिक वेळा एकच स्पर्धा जिंकली आहेत. त्याने १२ वेळा रोलंड गॅरोसचे जेतेपदही जिंकले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2021 5:28 pm

Web Title: rafael nadal wins barcelona open title for 12th time adn 96
Next Stories
1 जिंकलंस भावा… ऑक्सिजन पुरवठ्यासाठी ऑस्ट्रेलियन खेळाडूने PM Cares निधीला दिले ३७ लाख रुपये
2 “मोदी स्टेडियमवर आज राहुल खेळणार”, जाफरचं गमतीशीर ट्विट होतंय व्हायरल
3 शो मस्ट गो ऑन! आयपीएलबाबत बीसीसीआयचं स्पष्टीकरण