इंडियन प्रिमीअर लिग स्पर्धेचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेस नेते राजीव शुक्ला यांच्याकडे बीसीसीआयचं उपाध्यक्षपद जाण्याचे संकेत मिळत आहेत. याचसोबत ब्रिजेश पटेल हे आयपीएलच्या अध्यक्षपदी आणखी एक टर्म संधी मिळणार असल्याचं कळतंय. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीचा मार्ग न स्विकारता रिक्त पदं सर्वांच्या सहमतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे. २४ डिसेंबर रोजी अहमदाबाद येथे बीसीसीआयची AGM पार पडणार आहे. या बैठकीत हे निर्णय घेतले जातील.

बीसीसीआयमधील सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीव शुक्ला यांच्या नावाला आपली सहमती दर्शवली असून…येत्या गुरुवारी ते उपाध्यक्ष पदासाठी आपला अर्ज दाखल करणार असल्याचं कळतंय. २०१७ सालपर्यंत राजीव शुक्ला उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेत सचिव पदावर काम करत होते. यानंतर २०१८ साली त्यांनी आयपीएलचे अध्यक्ष म्हणून काम केलं. दरम्यान अहमदाबाद येथे होणाऱ्या AGM आधी सर्व सभासद आणि पदाधिकाऱ्यांना आपली कोविड चाचणी करणं बंधनकारक करण्यात आलंय.