26 September 2020

News Flash

उत्तर प्रदेशची दमदार सुरुवात

तन्मय श्रीवास्तव आणि प्रशांत गुप्ता यांच्या दिमाखदार फलंदाजीच्या बळावर रणजी स्पध्रेच्या ‘अ’ गटातील लढतीत उत्तर प्रदेशने मुंबईविरुद्ध पहिल्या दिवशी १ बाद ११५ अशी दमदार सुरुवात

| December 22, 2014 03:56 am

तन्मय श्रीवास्तव आणि प्रशांत गुप्ता यांच्या दिमाखदार फलंदाजीच्या बळावर रणजी स्पध्रेच्या ‘अ’ गटातील लढतीत उत्तर प्रदेशने मुंबईविरुद्ध पहिल्या दिवशी १ बाद ११५ अशी दमदार सुरुवात केली आहे. खराब हवामानामुळे ग्रीन पार्क स्टेडियमवरील या सामन्यांत फक्त ५० षटकांचा खेळ होऊ शकला.
उत्तर प्रदेशने नाणेफेक जिंकल्यावर प्रथम फलंदाजी स्वीकारली. मुंबईचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने मुकुल डागरचा (१५) अडसर दूर केला. परंतु श्रीवास्तव आणि गुप्ता यांनी ८७ धावांची नाबाद भागीदारी करून संघाचा डाव सावरला. खेळ थांबला तेव्हा, श्रीवास्तव ४९ व गुप्ता ४१ धावांवर खेळत होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2014 3:56 am

Web Title: ranji trophy uttar pradesh starts good
टॅग Ranji Trophy
Next Stories
1 सचिन २०१५च्या विश्वचषकाचा सदिच्छादूत
2 ‘गाबा’त झाली शोभा..
3 टेनिस लीगचा पसारा
Just Now!
X