News Flash

वेस्ट इंडिज मालिकेसाठी रविंद्र जडेजाला वगळले, झहीरला संधी नाहीच

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांसाठी १५ क्रिकेटपटूंच्या भारतीय संघातून सुरेश रैना, रविंद्र जडेजा यांना वगळण्यात आले आहे.

| October 31, 2013 02:45 am

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांसाठी १५ क्रिकेटपटूंच्या भारतीय संघातून सुरेश रैना, रविंद्र जडेजा यांना वगळण्यात आले आहे. मध्यमगती गोलंदाज झहीर खान याला संघात स्थान मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, ती फोल ठरली. झहीरला संघात स्थान देण्यात आलेले नाही. कसोटी क्रिकेटमध्ये दमदार आगमन करणाऱया शिखर धवनला संघामध्ये स्थान देण्यात आले आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने या कसोटी मालिकेनंतर आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे.
भारतीय संघ
महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार, प्रग्यान ओझा, अमित मिश्रा, अजिंक राहणे, उमेश यादव, मोहंमद सामी, रोहित शर्मा, इशांत शर्मा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 31, 2013 2:45 am

Web Title: ravindra jadeja ruled out no place for zaheer khan for west indies tests
टॅग : Team India
Next Stories
1 विराट आणि सनसनाटी!!
2 गोलंदाजांची निवड करताना निवड समितीची कसोटी
3 सचिनच्या रणजी कारकिर्दीचा सुखान्त!
Just Now!
X