भारतीय कबड्डी संघासाठी २०१६ हे साल अतिशय संस्मरणीय ठरलं होतं. अहमदाबाद येथे झालेल्या कबड्डी विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीत इराणवर मात करत भारताने जग्गजेतेपद पटकावलं होतं. क्रिकेटवेड्या भारत देशात त्या काळातही भारतीय क्रीडाप्रेमींनी या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद दिला होता. सध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जगभरात क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत Star Sprots वाहिनीवर २०१६ च्या कबड्डी विश्वचषकाचा थरार पुन्हा एकदा दाखवला जाणार आहे.

२० ते २४ मार्चदरम्यान सकाळी साडेदहा वाजता हे सामने दाखवले जाणार आहेत. या स्पर्धेत पहिल्याच सामन्यात भारताला, दक्षिण कोरियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र यानंतर भारताने दणक्यात पुनरागमन करत उपांत्य फेरीचा अडथळा दूर करत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीतही भारताने अटीतटीच्या लढतीत इराणवर मात केली होती. असं असेल सामन्यांचं वेळापत्रक….

  • २० एप्रिल – भारत विरुद्ध दक्षिण कोरिया
  • २१ एप्रिल – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
  • २२ एप्रिल – भारत विरुद्ध बांगलादेश
  • २३ एप्रिल – भारत विरुद्ध थायलंड (उपांत्य फेरी)
  • २४ एप्रिल – भारत विरुद्ध इराण (अंतिम फेरी)