News Flash

सेहवाग म्हणतो आता आपण जुन्या जमान्यातले, सचिनसोबतची भेट नेहमीच ‘ग्रेट’

रोहन गावसकरने शेअर केला सचिन-सेहवाग जोडीसोबतचा फोटो

सेहवागने सचिनसोबतचा ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो शेअर केला आहे.

माजी क्रिकेटर आणि सुनील गावसकर यांचा मुलगा रोहन गावसकर ट्विटरवरील फोटोमुळे चर्चेत आला आहे. रोहनने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यांच्यासोबतचा एक फोटो ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. रोहनने या फोटोला सुंदर असे कॅप्शन दिलयं. भारताच्या दिग्गज सलामीवीरांसोबतचा एक क्षण असा उल्लेख त्याने कॅप्शनमध्ये केलाय. सचिन आणि सेहवागसोबत असा फोटो क्लिक करणारा रोहन एकमेव क्रिकेटर नाही. त्याच्यासोबतच भारताचा माजी फलंदाज हेमांग बदानी यानेही भारताच्या माजी सलामीवीरांसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. एक मास्टर, एक जादूगर आणि एक प्रेक्षक या कॅप्शनसह बदानीने सचिन आणि सेहवाग या माजी सलामीवीर जोडीसोबतचा फोटो शेअर केलाय.

रोहन आणि हेमांग यांनी पोस्ट केलेले दोन्ही फोटो हे झहीर आणि सागरिका घाटगे यांच्या मेहंदीच्या कार्यक्रमावेळी काढण्यात आले आहेत. आपण जुन्या काळातील असल्याचे सांगण्यासाठी सेहवागने सचिनसोबतचा ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो शेअर केला आहे. सचिनला भेटणे नेहमीच आनंदी क्षण असतो, असा उल्लेख त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटो कॅप्शनमध्ये केला आहे.

भारताचा माजी गोलंदाज झहीर खान आणि बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगे यांचा विवाह नुकताच पार पडला. त्यानंतर या जोडीने सोमवारी रिसेप्शनचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातील त्यांच्या जवळच्या मित्रांनी हजेरी लावली होती. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी देखील रिसेप्शनला हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2017 1:24 pm

Web Title: rohan gavaskars caption of his picture with sachin tendulkar and virender sehwag is damn hilarious
Next Stories
1 श्रेयस अय्यरने शेअर केला सुश्मिता सेनसोबतचा फोटो
2 मुंबईचा ‘खडूस’ खेळ, त्रिपुरावर १० गडी राखून मात करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
3 Photos: महिला-बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे ‘ब्लॅकबेल्ट’, पुत्र आर्यमनलाही ७३ किलो वजनी गटात सुवर्णपदक
Just Now!
X