भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली, सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि शिखर धवन यांना झिम्बाब्वे दौऱ्यावरील छोटेखानी मालिकेसाठी विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. या मालिकेसाठी महेंद्रसिंग धोनीचा सहभागसुद्धा धूसर मानला जात आहे.

११ जूनपासून सुरू होणाऱ्या भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्यात तीन एकदिवसीय आणि दोन ट्वेन्टी-२० सामन्यांचा समावेश आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, झिम्बाब्वे दौऱ्यासाठी विराट आणि रोहित यांना विश्रांती दिली जाऊ शकते. गेले सहा महिने हे दोघे अथक क्रिकेट खेळत आहेत. वेस्ट इंडिज मालिकेसाठी ते उपलब्ध राहावेत, यासाठी त्यांना विश्रांती दिली जाणार आहे. शिखर धवनच्या खेळण्याबाबतसुद्धा साशंकता आहे.