News Flash

रोहित शर्मा रितिकाशी विवाहबद्ध

भारताचा सलामीवीर रोहित शर्माचा प्रेयसी रितिका सजदेहशी रविवारी विवाह झाला

रोहित शर्मा रितिकाशी विवाहबद्ध

भारताचा सलामीवीर रोहित शर्माचा प्रेयसी रितिका सजदेहशी रविवारी विवाह झाला. मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडलेल्या या लग्नसोहळ्यात भारतीय क्रिकेटमधील आजी-माजी दिग्गजांपासून ते उद्योगपती, राजकारणी, सिने तारे-तारकांनी आवर्जुन उपस्थिती लावली होती. या सर्वानी या नवदाम्पत्याला ‘नांदा सौख्य भरे..’ असा आशीर्वाद दिला.

या लग्नसोहळ्याला भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर पत्नी अजंलीसह, भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी पत्नी साक्षीसह, अजिंक्य रहाणे पत्नी राधिकासह, हरभजन सिंग पत्नी गीतासह जातीने हजर होते. तसेच गौतम गंभीर, सुरेश रैना, शिखर धवन, विराट कोहली, युवराज सिंग, व्ही.व्ही.एस लक्ष्मण या क्रिकेटपटूंसह अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय-बच्चन, विद्या बालन, सुनील शेट्टी, अथीया शेट्टी, बोनी कपूर व श्रीदेवी, सुष्मिता सेन, अमिषा पटेल या बॉलिवूड तारकांनी उपस्थिती लावली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2015 6:04 am

Web Title: rohit sharma to get married today to ritika
टॅग : Married,Rohit Sharma
Next Stories
1 विश्वनाथन आनंदची बरोबरीवर बोळवण
2 भारत-पाकिस्तान मालिकेचे प्रकरण बंद – शहरयार खान
3 ‘ऑनलाइन’ स्पर्धेत एकाग्रतेचीच कसोटी
Just Now!
X