News Flash

तेंडुलकर इस्पितळातून घरी

इस्पितळातील कर्मचाऱ्यांचेही सचिनने यावेळी आभार मानले.

(संग्रहित छायाचित्र)

करोनाची लागण झालेला भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरला गुरुवारी इस्पितळातून घरी पाठवण्यात आले आहे.

गेल्या महिन्यात रस्ते सुरक्षा जागतिक क्रिकेट मालिकेत सहभागी झालेल्या सचिनच्या करोना चाचणीचा अहवाल २७ मार्चला सकारात्मक आला होता. त्यानंतर खबरदारी म्हणून २ एप्रिलला त्याला इस्पितळात दाखल करण्यात आले होते.

‘‘मी आताच इस्पितळातून घरी आलो आहे. त्यामुळे मी पुढील काही दिवस विलगीकरणातच असेन. ही विश्रांती माझ्यासाठी महत्त्वासाठी असेल. माझ्यासाठी शुभेच्छा आणि प्रार्थना करणाऱ्या चाहत्यांचा मी आभार आहे,’’ असे घरी परतल्यानंतर सचिनने ‘ट्विटर’वर म्हटले आहे. इस्पितळातील कर्मचाऱ्यांचेही सचिनने यावेळी आभार मानले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2021 12:12 am

Web Title: sachin tendulkar at home from the hospital abn 97
Next Stories
1 ऑनलाइन बुद्धिबळात फसवणूक करणे सोपे!
2 भारताची अर्जेंटिनाशी बरोबरी
3 भारताचे हरेंद्र सिंग अमेरिकेचे हॉकी प्रशिक्षक
Just Now!
X