30 March 2020

News Flash

आमच्या सचिनचा स्वॅगच भारी…सोशल मीडियावर दादाला केलं ट्रोल

दोघांमधील थट्टा-मस्करीला नेटकऱ्यांचीही पसंती

बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सुत्र हाती आल्यानंतर सौरव गांगुलीची दिनचर्या सध्या बदलून गेली आहे. गांगुलीच्या पुढाकारामुळे गेल्या काही दिवसांत बीसीसीआयमध्ये काही अमुलाग्र बदल दिसून आले. भारतीय संघाची कमान यशस्वीपणे सांभाळण्याचा अनुभव असलेल्या सौरवकडून क्रिकेट प्रेमींना अनेक अपेक्षा आहेत. वेळोवेळी सौरव भारतीय क्रिकेटशी निगडीत महत्वाच्या विषयांवर आपली मत मांडत असतो.

सौरवने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर, सकाळी व्यायाम केल्यानंतरचा फोटो पोस्ट केला होता.

 

View this post on Instagram

 

A good fitness session in a cold morning is very freshning ….

A post shared by SOURAV GANGULY (@souravganguly) on

साहजिकच त्याच्या या फोटोवर चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं. मात्र सौरवचा जुना साथीदार आणि भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू सचिनने या फोटोवर खुद्द दादाशी पंगा घेत त्याला ट्रोल केलं आहे. पाहा सचिन आणि सौरवमध्ये रंगलेला हा गमतीशीर संवाद…

सौरव गांगुलीच्या पुढाकारामुळे भारतीय संघाने २०१९ साली आपला पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळला. त्यामुळे आगामी काळात सौरवच्या नेतृत्वाखाली BCCI मध्ये नेमके काय बदल होतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2020 5:39 pm

Web Title: sachin tendulkar funnily trolls sourav ganguly over skipping training sessions during their playing days psd 91
Next Stories
1 वायदा वेगळा आणि रक्कम वेगळीच, ‘महाराष्ट्र केसरी’ विजेत्या प्रशिक्षकांचा आरोप
2 धोनी वन-डे क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची शक्यता, रवी शास्त्रींनी दिले संकेत…
3 T20 World Cup 2020 : धोनीला स्थान नाही; शुभमन गिल संघात
Just Now!
X