आयपीएलच्या तेराव्या हंगामात २४ ऑक्टोबर रोजी किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद यांच्यात झालेला सामना पंजाबने १२ धावांनी जिंकला. या सामन्यादरम्यान घडलेल्या एका प्रसंगामुळे माजी भारतीय क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला चांगलीच चिंता वाटत आहे. पंजाबच्या क्षेत्ररक्षकाने फेकलेला चेंडू हैदराबादच्या विजय शंकरला लागला. सुदैवाने हेल्मेट असल्यामुळे विजयला फारशी दुखापत झाली नाही. मात्र या प्रसंगाचा दाखला देत सचिनने आयसीसीला सर्व फलंदाजांसाठी हेल्मेट घालणं बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्याची विनंती घेतली आहे.

काळानरुप क्रिकेट वेगवान होत चाललं आहे पण खेळ सुरक्षित झालाय का?? आपण सर्वांनी एक असा प्रसंग अनुभवला आहे की जो खूप दुर्दैवी ठरु शकला असता. यासाठी आयसीसीला माझी विनंती आहे की प्रोफेशनल लेव्हलवर क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक फलंदाजाला हेल्मेट घालणं बंधनकारक करावं.

या प्रसंगाच्या निमीत्ताने सचिनला याआधी घडलेल्या एका प्रसंगाची आठवण झाली.

त्यामुळे आगामी काळात सचिनच्या या मागणीला क्रिकेट विश्वातून कसा प्रतिसाद येतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.