मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. पण क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरीही त्याचे क्रिकेटवरील प्रेम जरासेही कमी झालेले नाही. नुकतेच त्याने विराट कोहलीबाबत गौरवोद्गार काढले आहेत. विराट हा सर्वोत्तम आहे, यात वाद नाही. पण तो सर्वोत्तम का आहे, हे सचिनने सांगितले आहे.

विराटचे परदेशातील आणि विशेषतः इंग्लंडमधील प्रदर्शन अद्याप उल्लखनीय असे झालेले नाही. पण आपल्या खेळात कुठे काय चुकते ते त्याला चांगले कळते. त्यामुळे आपल्या खेळातील उणीव समजून घेऊन आणि त्यानुसार त्यात बदल करून विराट कायम खेळतो, हि गोष्ट विराटला सर्वांपेक्षा वेगळे बनवते. म्हणून विराट सर्वोत्तम खेळाडू आहे, असे सचिन म्हणाला.

विराटकडे स्वतःमधील उणिवा ओळखण्याची क्षमता असून, त्यात तो मेहनतीनं तात्काळ सुधारणा करतो. त्यामुळे तो काही काळ जागतिक क्रिकेटमध्ये अव्वल स्थानी राहील. विराटच्या डोळ्यांत नेहमीच धावांची भूक बघायला मिळते. आपण कुठेतरी कमी पडतो, असे वाटल्यानंतर तो नेटमध्ये सराव करून ती उणीव भरून काढतो. हा त्याच्यातील सर्वात चांगला गुण आहे,’ अशा शब्दांत सचिनने विराटचे कौतुक केले. तसेच, सामन्याआधी केलेली तयारी आणि रणनिती यावर विराटने ठाम राहायला हवे. कारण लयीत उतार-चढाव आले, तरी निराश होऊ नये, असा सल्लाही सचिनने दिला.