अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं मुंबईतील राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवलं. त्याने घेतलेल्या टोकाच्या निर्णयामुळे सिनेसृष्टीसह अनेकांना धक्का बसला. सुशांतनं अभिनयाच्या जोरावर त्यांची स्वतःची ओळख बनवली होती. विशेषतः महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्यावरील सिनेमात त्याने साकारलेली भूमिका लोकांच्या खास आठवणीत आहे. ही भूमिका साकारताना सुशांतनं प्रचंड मेहनत घेतली होती. एकदा सराव सराव करत असताना सुशांतला सचिन तेंडुलकरनं बघितलं, सुशांतची फलंदाजी बघून सचिनही अवाक् झाला होता.

‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात भूमिका साकारताना सुशांतनं क्रिकेटचं प्रशिक्षण घेतलं होतं. भारताचे माजी यष्टीरक्षक आणि राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष किरण मोरे यांनी सुशांतला क्रिकेटचे धडे दिले होते. त्यावेळच्या सुशांत सोबतच्या काही आठवणींना किरण मोरे यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना उजाळा दिला.

Akash Chopra Says Hardik Pandya’s yet but his absence is definitely hurting GT this season
IPL 2024 : “त्याच्या उपस्थितीचा मुंबईला फायदा झाला नसेल, पण…”, हार्दिक पंड्याबाबत माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य
Former England star spinner Derek Underwood passes away
इंग्लंडचे फिरकी गोलंदाज डेरेक अंडरवूड यांचे निधन
Real Reason Behind MSD's Early Test Retirement
VIDEO : ‘जर तुला मूल हवे असेल तर …’, साक्षीने धोनीच्या कसोटी क्रिकेटमधून लवकर निवृत्तीचे खरे कारण सांगितले
Andre Russell Closed His Ears as fans cheer when ms dhoni came to bat
IPL 2024: धोनीची एंट्री होताच जल्लोष टिपेला; आंद्रे रसेलने ठेवले कानावर हात- व्हीडिओ व्हायरल

किरण मोरे म्हणाले, “सुशांतला फलंदाजी व यष्टीरक्षणाचं प्रशिक्षण देण्याबद्दल ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाचे दिग्दर्शक नीरज पांडे व निर्माता अरूण पांडे यांनी मला विचारलं. मला आठवतंय, प्रशिक्षणाच्या काही आठवड्यानंतर सुशांत धोनीच्या फेमस हेलिकॉप्टर शॉटचा सराव करत होता. त्यावेळी सचिन तेंडुलकर वांद्रेतील ‘बीकेसी’ मैदानावर आला होता. सचिन गॅलरीतून सुशांतची फलंदाजी बघत होता. सुशांतचा सराव संपल्यानंतर थोड्या वेळानं मी सचिनला भेटलो. त्यावेळी सचिन मला म्हणाला,’तो मुलगा कोण आहे? तो खूप चांगली फलंदाजी करतोय.’ त्यावर मी सचिनला सांगितलं की, तो अभिनेता सुशांत आहे. तो धोनीवर येणाऱ्या चित्रपटासाठी तयारी करत आहे. हे ऐकून सचिन अवाक् झाला. त्यानंतर तो मला म्हणाला,’जर त्याची इच्छा असेल, तर तो प्रोफेशनल क्रिकेट खेळू शकतो.’ तो चांगला खेळाडू असल्याचं सचिनला दिसलं होतं,” असं किरण मोरे यांनी सुशांतविषयी बोलताना सांगितलं.

मैदानावर येताना एकटंच यायचं

“जेव्हा मला सुशांतला प्रशिक्षण देण्याविषयी विचारण्यात आलं. तेव्हा ते माझ्यासमोर मोठं आव्हान होतं. कारण एका अभिनेत्याला खेळाडू बनवायचं होतं. तेही धोनीसारखा खेळाडू. सुशांत पहिल्यांदा ज्या वेळी मैदानावर आला, तेव्हा तो स्पॉट बॉय, सुरक्षा रक्षक व मदतनीसाला सोबत घेऊन आला होता. त्यावेळी मी त्याला बाजूला घेऊन गेलो आणि सांगितलं की, उद्यापासून एकट्यानेच आलं पाहिजे. किट बॅग घेऊन मैदानात यायचं. तुला किक्रेटपटू व्हायचं, तर तुला तसं राहावं लागेल, असं मी त्याला म्हणाल्याचं मला आठवतंय,” असंही मोरे यांनी सुशांतविषयी बोलताना सांगितलं.