07 July 2020

News Flash

थायलंड ग्रां. प्रि. बॅडमिंटन : सायना नेहवालचे आव्हान संपुष्टात

अग्रमानांकित सायना नेहवालला थायलंड ग्रां. प्रि. बॅडमिंटन स्पर्धेचे आपले गतविजेतेपद टिकवण्यात अपयश आले आहे. उपांत्यपूर्व फेरीतच सिंगापूरच्या जुआन गुओ हिने सायनावर १३-२१, २१-१२, २१-१८ अशा

| June 8, 2013 03:33 am

अग्रमानांकित सायना नेहवालला थायलंड ग्रां. प्रि. बॅडमिंटन स्पर्धेचे आपले गतविजेतेपद टिकवण्यात अपयश आले आहे. उपांत्यपूर्व फेरीतच सिंगापूरच्या जुआन गुओ हिने सायनावर १३-२१, २१-१२, २१-१८ अशा फरकाने मात केली.
जागतिक क्रमवारीतील द्वितीय स्थानावरील सायनाने गतवर्षी या स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. त्यामुळे तिच्याकडून त्या कामगिरीच्या पुनरावृत्तीची अपेक्षा होती. तथापि, जुआन हिने केलेल्या चतुरस्र खेळापुढे तिला आव्हान टिकविता आले नाही. जुआनविरुद्ध आतापर्यंत सायनाची सहा वेळा लढत झाली आहे. त्यामधील तिचा हा पहिलाच पराभव आहे. ५३ मिनिटांच्या या खेळात आठव्या मानांकित जुआनला सायनाने केलेल्या अक्षम्य चुकांचा फायदा झाला.
दरम्यान, युवा बॅडमिंटनपटू के. श्रीकांतने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. श्रीकांतने दक्षिण कोरियाच्या वान हो सनचा २१-१७, २१-१८ असा सरळ गेम्समध्ये पराभव करत उपांत्य फेरी गाठली. आता त्याचा मुकाबला थायलंडच्या थामासिन सिट्टीकोमशी होणार आहे. अन्य भारतीय बॅडमिंटनपटूंचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्याने श्रीकांत हा भारताचा एकमेव प्रतिनिधी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2013 3:33 am

Web Title: saina crashes out of thailand open
टॅग Saina Nehwal
Next Stories
1 दुखापतीमुळे मॉर्केलची माघार
2 कुंद्राच्या कबुलीने धक्का बसला! -जगदाळे
3 .. आणि राज-शिल्पाच्या ‘ट्विटर’बाजीचा फुगा फुटला!
Just Now!
X