X

सायना नेहवाल क्रमवारीत स्थिर

कामगिरीत सातत्याचा अभाव असणाऱ्या कश्यपच्या स्थानातही घसरण झाली असून, तो १५व्या स्थानी आहे.

नुकत्याच झालेल्या सुपरसीरिज फायनल्स स्पर्धेत, उपांत्यपूर्व फेरीत गाशा गुंडाळावा लागलेल्या सायना नेहवालने जागतिक क्रमवारीत दुसरे स्थान कायम राखले आहे. याच स्पर्धेत प्राथमिक फेरीतूनच माघारी परतलेल्या किदम्बी श्रीकांतच्या क्रमवारी स्थानात एकाने घसरण झाली आहे. श्रीकांत आता नवव्या स्थानी आहे.

कामगिरीत सातत्याचा अभाव असणाऱ्या कश्यपच्या स्थानातही घसरण झाली असून, तो १५व्या स्थानी आहे. एच. एस. प्रणॉय २०व्या स्थानी स्थिर आहे. अजय जयरामने एका स्थानाने सुधारणा केली असून, तो आता २२व्या स्थानी आहे.

महिलांमध्ये, पी.व्ही. सिंधू १२व्या स्थानी स्थिर आहे. दुहेरीत ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा १३व्या स्थानी कायम आहेत. पुरुष दुहेरीत मनू अत्री आणि सुमीत रेड्डी जोडीची घसरण होऊन ही जोडी २०व्या स्थानी स्थिरावली आहे.

  • Tags: saina-nehwal,