Advertisement

कभी आगे तू कभी पीछे मै..! स्कॉटलंडहून मागवलेल्या घोड्यासह ३९ वर्षीय धोनीनं लावली शर्यत

धोनीच्या बायकोनं शेअर केलेला व्हिडिओ तुम्ही पाहिला का?

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी रांची येथील आपल्या फार्म हाऊसमध्ये आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवत आहे. तो सोशल मीडियावर कमी अ‍ॅक्टिव्ह असतो, परंतु त्याची पत्नी साक्षी बर्‍याचदा फोटो-व्हिडिओ शेअर करते. या व्हिडिओमध्ये धोनी असतो. साक्षीने शनिवारी एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात ३९ वर्षीय धोनी आपल्या नवीन घोड्यासह धावताना दिसत आहे.

साक्षीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये धोनी ब्लॅक टी-शर्ट आणि लोअरमध्ये धावत असल्याचे दिसत आहे. त्याच्याबरोबर त्याच्या शेटलँड जातीचा नवा घोडाही धावत आहे. साक्षीने ‘मजबूत, वेगवान’ असे कॅप्शन या व्हिडिओला दिले आहे.

हेही वाचा – खरा नायक! युरो कपमधील काळजाचा ठोका चुकवणाऱ्या घटनेनंतर मॅच रेफरी ठरले चर्चेचा विषय

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sakshi Singh Dhoni (@sakshisingh_r)

अलीकडेच धोनीने स्कॉटलंडमधून शेटलंड पोनी जातीचा हा घोडा विकत घेतला. साक्षीने यापूर्वी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये हा घोडा घरातील पाळीव कुत्र्यांसह खेळताना दिसला. या व्हिडिओतून धोनीचे प्राणी आणि हा नवीन घोडा यात मैत्री झाल्याचे दिसून आले होते.

२ वर्षांचा हा घोडा जगातील सर्वात लहान जातींपैकी एक आहे. त्याची उंची फक्त ३ फूट आहे. धोनीकडे आधीपासूनच चेतक नावाचा घोडा आहे, जो ११ महिन्यांचा आहे. काही दिवसांपूर्वी साक्षीने एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये धोनी चेतकसोबत वेळ घालवताना दिसला होता. रांची येथील महेंद्रसिंह धोनीच्या साम्बो फार्म हाऊसमध्ये घोडेस्वारीची तयारी जोरात सुरू आहे. यासाठी ५-६ घोडे बाहेरून आणावे लागतात.

हेही वाचा – युरो कपमधील ‘त्या’ धक्कादायक घटनेनंतर मुंबई इंडियन्सचं ट्वीट होतंय व्हायरल!

धोनीची कामगिरी

धोनी हा भारताकडून सर्वाधिक सामने जिंकणारा कर्णधार आहे. त्याने ३३२ सामन्यांचे नेतृत्व केले. यापैकी त्याने १७८ सामन्यात विजय मिळवला आहे. धोनीने आयपीएल टीम चेन्नई सुपर किंग्जचा तीन विजेतेपदे मिळवून दिली आहेत. याशिवाय त्यांनी चॅम्पियन्स लीग टी-२०चे विजेतेपदही जिंकले आहे.

24
READ IN APP
X
X