News Flash

अ. भा. मानांकन टेनिस स्पर्धा : महाराष्ट्राच्या सालसाला दुहेरी विजयाची संधी

महाराष्ट्राच्या सालसा आहेरने एकेरी आणि दुहेरी अशा दोन्ही गटांत अंतिम फेरी गाठली आहे. 

कैवल्य कलमसे

पांचगणी : रवाईन हॉटेल येथे चालू असलेल्या ‘एमएसएलटीए’ रवाईन हॉटेल अखिल भारतीय मानांकन टेनिस स्पर्धेच्या महिला गटात महाराष्ट्राच्या सालसा आहेरने एकेरी आणि दुहेरी अशा दोन्ही गटांत अंतिम फेरी गाठली आहे. महाराष्ट्राच्या सातव्या मानांकित कैवल्य कलमसेने मध्य प्रदेशच्या दुसऱ्या मानांकित यश यादवचा टायब्रेकमध्ये ३-६, ६-४, ७-६ (७-५) असा संघर्षपूर्ण पराभव केला. पश्चिम बंगालच्या अव्वल मानांकित युब्रानी बॅनर्जीने आजारपणामुळे माघार घेतल्याने महाराष्ट्राच्या चौथ्या मानांकित सालसा आहेरने या सामन्यातून माघार घेतली. दुहेरीत महिला गटात युब्रानी बॅनर्जी व सालसा आहेर यांनी ईश्वरी माथेरे व पूजा इंगळे यांचा ६-३, ६-१ असा पराभव केला.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2019 12:00 am

Web Title: salsa aher reached in final of hotel ravine all india ranking tennis tournament zws 70
Next Stories
1 “हिंदू होता म्हणून त्याला पाकिस्तानचे क्रिकेटपटू द्यायचे त्रास”; शोएब अख्तरचा गौप्यस्फोट
2 …म्हणून त्याने धवनला मारल्या लाथा, चूक लक्षात येताच मागितली माफी
3 Asia vs World T20I : BCCI ला नडणं पाकला भोवणार, आशिया संघातून पाक खेळाडूंची गच्छंती??
Just Now!
X