21 January 2021

News Flash

सानिया मिर्झा ठरली Fed Cup Heart पुरस्काराची मानकरी, बक्षीसाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला दान

मानाचा पुरस्कार जिंकणारी सानिया पहिली भारतीय महिला खेळाडू

भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झाने प्रतिष्ठेचा Fed Cup Heart पुरस्कार पटकावला आहे. हा पुरस्कार जिंकणारी सानिया पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. Asia/Oceania गटात सानिया मिर्झाने १० हजारापेक्षा जास्त मत घेत या पुरस्कारावर आपली मोहर उमटवली आहे. चाहत्यांनी केलेल्या ऑनलाईन व्होटिंगद्वारे सानिया मिर्झाला हा पुरस्कार मिळाला आहे. एकूण मतांपैकी ६० टक्के मत सानिया मिर्झाला पडली आहेत.

Fed Cup Heart पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय ठरल्याचा मला अभिमान आहे. मी हा पुरस्कार माझ्या देशवासियांना समर्पित करते, आणि माझ्या चाहत्यांचीही मी आभारी आहे. देशासाठी अशीच चांगली कामगिरी करत राहण्याचा माझा मानस असल्याचं सानिया मिर्झाने म्हटलंय.

Fed Cup Heart पुरस्कार विजेत्या खेळाडूंना २ हजार अमेरिकन डॉलर्सचं बक्षीस मिळतं. सानिया मिर्झाने आपल्याला मिळालेली बक्षीसाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला दान करण्याचं जाहीर केलं आहे. गेली काही वर्ष बाळंतपणामुळे मैदानापासून दुरावलेल्या सानिया मिर्झाने गेल्या वर्षी दमदार पुनरागमन केलं होतं. होबार्ट आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महिला दुहेरी स्पर्धेचं विजेतेपद मिळवत सानियाने आपल्यातला खेळ अजुन शिल्लक असल्याचं स्पष्ट केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2020 9:32 pm

Web Title: sania mirza wins fed cup heart award donates prize money to cms relief fund psd 91
Next Stories
1 तोंड बंद ठेव आणि बॅटिंग कर, तू लहान मुलासारखं वागतोयस ! जेव्हा केसरिक विल्यम्स विराटला सुनावतो
2 डॉक्टर म्हणाले तू कधीही चालू शकणार नाहीस, २० वर्षांच्या मेहनतीनंतर ती ठरली ‘खेल रत्न’
3 “बटर चिकन आणि बिर्याणीवर ताव मारूनही धोनी मैदानात सुसाट धावायचा”
Just Now!
X