स्पॉट-फिक्सिंग प्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त करण्यास  मनुष्य बळ विकास खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री शशी थरूर यांनी नकार दिला. दोन वर्षांपूर्वी कोची टस्कर्स फ्रँचाईजी स्थापन करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
स्पॉट-फिक्सिंगमधील मुख्य आरोपी एस. श्रीशांत हा कोची संघाकडून खेळत असे. त्याला अटक झाल्यानंतर थरूर म्हणाले होते की, जोपर्यंत न्यायालयात त्याच्यावरील आरोप सिद्ध होत नाहीत, तो पर्यंत त्याला आरोपी म्हणणे चुकीचे होईल.
स्पॉट-फिक्सिंगखेरीज अन्य कोणत्याही विषयावर मी उत्तर देऊ शकेन. मात्र आयपीएलविषयी मी काहीही मत व्यक्त करणार नाही, असे थरूर यांनी सांगितले.