करोनामुळे गेले अडीच-तीन महिने क्रीडा स्पर्धांना ब्रेक लागला होता. त्यानंतर आता अखेर काही क्रीडाप्रकार हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. ८ जुलैपासून सुरू आंतरराष्ट्रीय क्रिकेटही सुरू होणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा संघ इंग्लंडमध्ये दाखलही झाला असून सध्या संघातील खेळाडू १४ दिवसांच्या क्वारंटाइनमध्ये आहेत. पण भारतीय संघाचे जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील नियोजित दौरे करोनाच्या भीतीने रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे भारतीय खेळाडूंना आणि क्रिकेट चाहत्यांना मात्र अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
घरात बसून कंटाळलेले भारतीय क्रिकेटपटू सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले मन रमवताना दिसत आहेत. याचदरम्यान भारताचा संयमी फलंदाज अजिंक्य रहाणे याने एक फोटो ट्विट केला. त्या फोटोत सलामीवीर रोहित शर्मा त्याची मुलाखत घेताना दिसत आहे. तो फोटो पोस्ट करत अजिंक्यने ‘फोटोतला संवाद काय असेल’ असं चाहत्यांना विचारलं.
त्या फोटोवर शिखर धवनने एक भन्नाट कमेंट केली. या फोटोत रोहित अजिंक्यला प्रश्न विचारताना दिसत आहे. त्यामुळे शिखरने लिहिलं की ‘रोहित अजिंक्यला विचारतोय की ‘भिडू, तुझ्या तोंडात काय आहे?’ त्यावर अजिंक्य उत्तर देतोय की ‘(तोंडात) मसाला (आहे)…’ अशी कमेंट करत शिखरने फोटोत अजिंक्यला ट्रोल केले.
या आधी अजिंक्यने विराटसोबतचा एक फोटो पोस्ट केला होता. त्या पोस्टमध्ये अजिंक्य आणि विराट कसली तरी वाट पाहत होते. त्या फोटोवर अजिंक्यने आम्ही क्रिकेट सुरू होण्याची वाट पाहत आहोत, असे लिहिले होते.