News Flash

करोनामुळे ‘शूटर दादी’ फेम चंद्रो तोमर यांचं निधन

त्यांच्या जीवनावर आधारित 'सांड की आँख' नावाचा चित्रपटही प्रदर्शित झालेला

(फोटो : Twitter/Shooter Dadi वरुन साभार)

उत्तर प्रदेशमधील बागपत येथील शूटर दादी नावाने लोकप्रिय असणाऱ्या नेमबाज चंद्रो तोमर यांचं करोनामुळे निधन झालं आहे. शुक्रवारी मेरठमधील एका रुग्णालयादरम्यान तोमर यांचं उपचारादरम्यान निधन झालं. त्या ८९ वर्षांच्या होत्या. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर मेरठमधील आनंद रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. २६ एप्रिल रोजी त्यांना करोनाचा संसर्ग झाला होता. यासंदर्भात त्यांनी स्वत: सोशल नेटवर्किंगवरुन माहिती दिली होती. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

शूटर दादी म्हणून लोकप्रिय असणाऱ्या तोमर यांनी नेमबाजीमध्ये राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये अनेक पदकं मिळवली होती. तोमर या बागपत येथील जोहडी गावामध्ये वास्तव्यास होत्या. लोकप्रिय चित्रपट निर्माता अनुराग कश्यपने शूटर दादीच्या जीवनावर आधारित ‘सांड की आँख’ नावाचा चित्रपटही केला होता. तापनी पन्नू आणि भूमी पेडणेकर या दोघींनी या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर तोमर यांच्या लोकप्रियतेमध्ये वाढ झाली होती. जगभरामध्ये त्यांना या चित्रपटानंतर नव्याने ओळख मिळाली आणि त्यांची संघर्ष कथा जगासमोर आली. वयाच्या साठाव्या वर्षानंतर बंदूक हाती घेतल्यानंतरही अनेक स्पर्धा गाजवणाऱ्या तोमर याचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी असल्याचं मत या चित्रपटानंतर अनेकांनी व्यक्त केलं. तोमर यांच्या निधनानंतर अनेकांनी सोशल नेटवर्किंगवरुन त्यांना श्रद्धांजली अर्पण केलीय.

१)

२)

३)

४)

उतार वयामध्येही तोमर या सोशल नेटवर्किंगवर प्रचंड सक्रीय होत्या. त्या ट्विटरवरही चांगल्याच सक्रीय होत्या. त्यांनी आपल्या ट्विटरवर पीन टू टॉप करुन ठेवलेल्या ट्विटमध्ये ‘मला किमान एकदा तरी जम्मू काश्मीरमध्ये भटकंती करायची आहे. मी तिथे कधीच गेली नाहीय. कधी तिथली परिस्थिती सामान्य होईल तेव्हा मी तिकडे नक्की जाईल,’ असं म्हटलंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2021 4:58 pm

Web Title: shooter dadi chandro tomar passes away due to covid 19 scsg 91
Next Stories
1 IPL 2021: ‘या’ महागड्या खेळाडूंना अजून एकही संधी नाही
2 ‘या’ खेळाडूंनी आयपीएलच्या पहिल्या षटकात ठोकल्या सर्वाधिक धावा
3 करोनामुळे IPL सोडण्याचा निर्णय घेतला, पण मायदेशी नाही जाऊ शकले पंच पॉल रॅफेल; आता…
Just Now!
X