News Flash

इंडोनेशिया बॅडमिंटन स्पर्धा : सिंधू, श्रीकांतची विजयी सलामी

पुढच्या फेरीत सिंधूचा मुकाबला इंडोनेशियाच्याच वुलान कहाया उतमी सुकोपुत्रीशी होणार आहे.

पी.व्ही.सिंधू

मकाऊ स्पर्धेत जेतेपदाची हॅट्ट्कि नोंदवणाऱ्या पी.व्ही.सिंधूसह किदम्बी श्रीकांत, एच. एस. प्रणॉय यांनी इंडोनेशिया ग्रां.प्रि. बॅडिमटन स्पध्रेत विजयी सलामी दिली. अव्वल मानांकित सिंधूने इंडोनेशियाच्या ग्रेगोरिआ मरिस्कावर २१-१६, १९-२१, २१-१२ असा विजय मिळवला. पुढच्या फेरीत सिंधूचा मुकाबला इंडोनेशियाच्याच वुलान कहाया उतमी सुकोपुत्रीशी होणार आहे.
पुरुष गटात अव्वल मानांकित श्रीकांतने इंडोनेशियाच्या विबोवो सेत्यलादी पुत्रावर २१-६, २१-१२ अशी मात केली. श्रीकांतची पुढची लढत इंडोनेशियाच्या सापुत्रा व्हिकी अंगाशी होणार आहे. आरएमव्ही गुरुसाईदत्तने इंडोनेशियाच्या मुहम्मद अहिदाल ओक्टा खैरुल्लाला २१-१०, २१-३ असे नमवले. एच. एस. प्रणॉयने इंडोनेशियाच्या पन्जी अहमद मौलानाचा २१-१६, २१-१६ असा पराभव केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2015 4:00 am

Web Title: sindhu shrikant won first match in indonesian badminton competition
टॅग : Sindhu
Next Stories
1 शंभर कसोटी खेळल्यानंतर क्रिकेटविषयी बोलण्याचा अधिकार
2 ‘आयसीसी’च्या संघात एकही भारतीय फलंदाज नाही
3 समारंभाला उपस्थित राहण्यासाठी सानियाकडून चार्टड प्लेन आणि महागड्या ‘मेक-अप किट’ची मागणी
Just Now!
X