भारताच्या सौरभ वर्माने सुरेख खेळाचे प्रदर्शन करत मलेशियन ग्रां. प्रि. सुवर्णचषक बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. मात्र आरएमव्ही गुरुसाईदत्त आणि पी. सी. तुलसी यांचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले.
सौरभने अटीतटीच्या झालेल्या सामन्यात तैपेईच्या टिएन चेन चोऊ याच्यावर २२-२०, १८-२१, २१-१५ असा विजय साकारला. त्याला उपांत्य फेरीत मलेशियाच्या वेई फेंग चोंग याच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.