सफल बोरा या पुण्याच्या १५ वर्षीय खेळाडूने बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टतर्फे आयोजित केलेल्या महेश्वरानंद सरस्वती करंडक राज्य फिडे निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले. या स्पर्धेत बोरा याने शेवटच्या फेरीत नागपूरच्या शैलेश द्रविड याच्यावर केवळ २९ चालींमध्ये विजय मिळविला.
बोरा याच्याबरोबरच अनिरुद्ध देशपांडे, अतुल डहाळे व अभिमन्यू पुराणिक यांचेही प्रत्येकी साडेसात गुण झाले. माध्यम गुणांच्या आधारे त्यांना अनुक्रमे पहिले चार क्रमांक मिळाले. देशपांडे, डहाळे, पुराणिक व पंडितराव यांची भोपाळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली.
अन्य गटवार निकाल
महिला : १. ऋतुजा बक्षी, २. जान्हवी सोनेजी.
प्रौढ : १. चंद्रकांत डोंगरे, २. रवींद्र नरगुंदकर.
बिगरमानांकित खेळाडू : १. केतन खैरे, २. परेश चौधरी.
१४ वर्षे : १.शारंग कपूर, २. हर्ष गर्ग.
१२ वर्षे : १. हर्षित राजा, २. अवधूत लेंढे.
१० वर्षे : १. संकर्ष शेळके, २. अवनीश शिळीमकर.
८ वर्षे : १. भाग्यश्री पाटील, २. वैभव कवी.