मुंबई : जेएसडब्ल्यूने महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे व्यावसायिक ग्रामीण गटातून विजेतेपद पटकावले. सलग दुसऱ्यांदा कामगार चषक आपल्याकडे राखण्यात जेएसडब्ल्यू संघाला यश आले. शहरी व्यावसायिक गटात मुंबई बंदरने आणि महिलांमध्ये महिलांमध्ये ठाणे मनपाने विजेतेपद पटकावले.

शहरी गटात मुंबई बंदरने सेंट्रल बॅँकेला २८-१४ असे नमवले. मुंबईच्या विजयात शुभम कुंभार, स्मितील पाटील, बिरज मगर यांचा खेळ मोलाचा ठरला. महिलांच्या अंतिम सामन्यात ठाणे मनपाने बँक ऑफ बडोदाचा ३०-२४ असा पराभव केला. कोमल देवकर, श्रद्धा पवार, मेघा कदम, तेजस्विनी पोटे यांचे योगदान ठाणे मनपाच्या विजयात मोलाचे ठरले.

मुंबई बंदरचा शुभम कुंभार पुरुषांमध्ये आणि ठाणे मनपाची श्रद्धा पवार स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. पुरुषांमध्ये उत्कृष्ट चढाईचा खेळाडू सेन्ट्रल बॅँकेचा ऋषिकेश गावडे आणि बँक ऑफ बडोदाचा दीपक शिंदे उत्कृष्ट पकडीचा खेळाडू ठरला. महिला विभागात उत्कृष्ट चढाईची खेळाडू एमरॉल्डची सिद्धी चाळके आणि उत्कृष्ट पकडीची खेळाडू बँक ऑफ बडोदाची पौर्णिमा जेधे ठरली.