प्रतिभावान डावखुरा अष्टपैलू बेन स्टोक्समध्ये इंग्लंडचे यशस्वी नेतृत्व करण्याची क्षमता असून स्वत:च्या आक्रमकतेवर नियंत्रण मिळवल्यामुळे तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीत नक्कीच छाप पाडेल, अशी प्रतिक्रिया भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने व्यक्त केली.

‘‘स्टोक्स हा पुढाकार घेऊन इंग्लंडचे सक्षम नेतृत्व करेल. त्याने स्वत:च्या आक्रमकतेवर नियंत्रण मिळवले असून कठीण परिस्थितीतून संघाला कशा प्रकारे सावरायचे, याची त्याला उत्तम जाण आहे. विंडीजविरुद्ध तो कर्णधार म्हणूनही नक्कीच यशस्वी होईल,’’ असे सचिन म्हणाला.