जगभरात सध्या एका छोट्या विषाणूने साऱ्यांना ‘लॉकडाउन’ केले आहे. करोनाच्या भीतीने क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाला ब्रेक लागला आहे. भारतातील लोकप्रिय IPL स्पर्धेचे आयोजनदेखील अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. सर्व क्रिकेटपटू आणि सहाय्यक वर्ग सध्या आपापल्या घरी आहे. काही क्रिकेटपटू लाइव्ह चॅटमध्ये व्यस्त आहेत, तर काही क्रिकेटपटू टिकटॉक आणि इतर प्रकारचे व्हिडीओ करत आहेत. या दरम्यान सुरेश रैनाने त्याची पत्नी प्रियंका हिच्यासोबत चेन्नई सुपर किंग्जमार्फत इन्स्टाग्राम लाईव्ह चॅट मध्ये सहभाग घेतला. या चॅट दरम्यान रैनाने प्रियंका ला कोणता खेळ आवडतो? क्रिकेट या खेळाबद्दल तिला काय वाटतं? तिचा आवडता खेळाडू कोणता? या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली.
त्यांचे काही वेगळेच खेळ सुरू होते – हरभजन
“जेव्हा जेव्हा प्रियंका क्रिकेट बघत असते तेव्हा ती कायम मला विचारत बसते की माही भाई (धोनी) किपिंग करताना त्याच्या मागच्या बाजूला हेल्मेट का ठेवतो? क्रिकेट हा खेळ आपण खेळापट्टीच्या एकाच बाजूने का नाही खेळू शकत? नेहमी षटक संपल्यावर दुसऱ्या बाजूला का जायचं असतं? तिचे प्रश्न मला आवडतात कारण ती स्वतः क्रिकेटची चाहती नाहीये. तिला फुटबॉल खूप आवडतो आणि अर्जेंटिनाचा मेस्सी हा तिचा सर्वात आवडत खेळाडू आहे. आमच्यासाठी मात्र धोनी हाच आमचा मेस्सी”, अशा मजेशीर गप्पा त्याने मारल्या.
“रैना, तु संघात परत यायला पाहिजेस”
सुरेश रैनाने दोन दिवसांपूर्वी रोहित शर्माशीही लाइव्ह चॅट केले. त्यावेळी रोहित शर्माने रैनाच्या पुनरागमनाची इच्छा व्यक्त केली. “खूप वर्षे आंतरराष्ट्रीय संघाकडून क्रिकेट खेळल्यानंतर संघातून वगळलं जाण्याची भावना दु:खदायक असते. आम्ही नेहमी चर्चा करतो की रैना आपल्या संघात पुन्हा खेळायला हवा. तुझ्याकडे अनुभव आहेत. तसेच तू फलंदाजीसह गोलंदाजी आणि फिल्डिंग करण्यातही सक्षम आहेस. मी तुला खूप वर्षांपासून खेळताना बघतोय. त्यामुळे मला खरंच असं वाटतं की तुझं टीम इंडियात पुनरागमन व्हायलाच हवं”, असं रोहित म्हणाला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 14, 2020 3:01 pm