स्वित्झर्लंडचा १९ वर्षीय मोटो-३ रायडर जेसन डुपास्कियरचा एका शर्यतीदरम्यान अपघातात मृत्यू झाला आहे. डुपास्कियरने इटालियन मोटोजीपीमध्ये सहभाग घेतला होता. या स्पर्धेत तो अपघातात गंभीर जखमी झाला होता. मोटोजीपीने त्याच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे.

”जेसन डुपास्कियरच्या निधनाची बातमी ऐकून आम्हाला फार वाईट वाटले आहे. संपूर्ण मोटोजीपी परिवाराच्या वतीने आम्ही त्याची टीम, त्याचे कुटुंबीय आणि प्रियजनांबद्दल आम्ही संवेदना व्यक्त करतो. जेसन, तुझी खूप आठवण येईल. देव तुझ्या आत्म्याला शांती देवो”, असे मोटोजीपीने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले.

हेही वाचा – जबरदस्त क्रिकेट कारकीर्द असूनही क्रिकेटच्या देवाला वाटतेय ‘या’ दोन गोष्टींची खंत!

 

 

 

डुपास्कियरचा हा मोटो-३ मधील हा फक्त दुसरा हंगाम होता. शर्यतीच्या वेळी तो इतर दुचाकीस्वारांना धडकला. या अपघातानंतर त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली वैद्यकीय सुविधा देण्यात आली. नंतर त्याला फलोरसे येथील कॅरेग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, तेथे त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. मात्र, त्याचे प्राण वाचवता आले नाहीत.

या घटनेनंतर डुपास्कियरची टीम प्रूएस्टल जीपीने रविवारच्या शर्यतीतून आपले नाव मागे घेतले.