ऑस्ट्रेलियामध्ये २०२० साली होणाऱ्या T20 World Cup 2020 स्पर्धेवर करोनाचे सावट आहे. एकूण १६ संघ सहभागी होणाऱ्या या स्पर्धेची नोव्हेंबरमध्ये सुरूवात होणार आहे. पण करोनाच्या तडाख्यामुळे सध्या सर्वत्र हाहा:कार माजला आहे. क्रीडा क्षेत्रावरही याचा परिणाम झाला आहे. सर्व मोठ-मोठ्या क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. चार वर्षांनी आयोजित करण्यात येणारी ऑलिम्पिक स्पर्धादेखील आता २०२० ऐवजी २०२१ मध्ये खेळवण्यात येणार आहे. पण ऑस्ट्रेलिया मात्र नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच विश्वचषक खेळवण्यासाठी आग्रही आहे. या दरम्यान, काही खेळाडू मात्र काहीसे वेगळे मत नोंदवत आहेत.

ना धोनी, ना युवराज, ना गंभीर… या खेळाडूमुळे जिंकलो विश्वचषक – सुरेश रैना

टी २० क्रिकेट विश्वचषकाचे आयोजन करताना खेळाडूंची उत्तम सोय हा मुद्दा नसून प्रेक्षक सामना पाहण्यासाठी हजेरी लावतील की नाही या मुद्द्याचा विचार केला जात आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचे क्रीडामंत्र्यांनी व्यक्त केले आहे. त्यातच इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉय याने आपले एक रोखठोक मत मांडले आहे. “जर खेळाडूंना विश्वचषक स्पर्धेची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार नसेल, तर ऑस्ट्रेलियाने विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात काहीच अर्थ नाही. त्यापेक्षा त्यांनी क्रिकेट स्पर्धा पुढे ढकलावी. आम्हाला सध्या तरी असं सांगण्यात आलं आहे की विश्वचषक स्पर्धेची तयारी करण्यासाठी तुम्हाला तीन आठवडे मिळतील आणि त्यानंतर तुम्हाला विश्वचषक खेळावा लागेल. त्यामुळे, जर खेळाडूंना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळणार असेल, तर मात्र क्रिकेट खेळणे हे आमचे कर्तव्य आहे”, असे रॉयने स्पष्ट केले.

VIDEO : विराट-गेल-फखरमध्ये रंगलं ‘स्टार वॉर’

जेसन रॉय

दरम्यान, या स्पर्धेत यजमान संघ (ऑस्ट्रेलिया) आणि जागतिक टी २० क्रमवारीतील सर्वोत्तम नऊ संघांना थेट प्रवेश देण्यात आला होता. तर पात्रता फेरीतील सामन्यांनंतर उर्वरित सहा संघांचे या स्पर्धेतील स्थान निश्चित झाले. पात्रता फेरीतून सर्वप्रथम आयर्लंड, नामिबिया, नेदरलँड्स आणि पापुआ न्यू गिनी हे देश पात्र ठरले. त्यानंतर बुधवारी रात्री ओमान व स्कॉटलंड या दोन संघांनी T20 World Cup 2020 मधील प्रवेश पक्का केला. ओमानने अटीतटीच्या सामन्यात हाँगकाँगवर १२ धावांनी विजय मिळवली आणि T20 World Cup 2020 स्पर्धेतील सहभाग निश्चित केला. तर स्कॉटलंडने युनायटेड अरब अमिरातीला (युएई) ९० धावांनी धूळ चारत T20 World Cup 2020 स्पर्धेतील स्थान निश्चित केले. यापैकी नामिबिया आणि पापुआ न्यू गिनी पहिल्यांदा टी २० विश्वचषक स्पर्धा खेळणार आहेत.

Coronavirus : कौतुकास्पद! क्रिकेट बोर्डाकडून अंपायर्स, ग्राऊंड स्टाफला आर्थिक मदत

T20 World Cup 2020 च्या फॉरमॅटनुसार आयर्लंड, नामिबिया, नेदरलँड्स, ओमान, पापुआ न्यू गिनी आणि स्कॉटलंड या सहा संघांना पहिल्या फेरीत दोन वेगवेगळ्या गटात क्रमवारीतील नवव्या आणि दहाव्या स्थानी असलेल्या संघांविरूद्ध खेळावे लागणार आहे. त्यानंतर या दोन गटातील सर्वाधिक गुण मिळवलेला प्रत्येकी १ संघ आणि क्रमवारीतील ८ संघ यांच्यात T20 World Cup 2020 स्पर्धेचे मूळ सामने रंगणार आहेत.