News Flash

WTC 2021 Final : टीम इंडिया इंग्लंडला पोहोचली, राहुलने शेअर केला फोटो

विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघ १८ जूनपासून न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपचा अंतिम सामना खेळणार आहे.

NEWS WTC 2021 Final: टीम इंडिया इंग्लंडला पोहोचल्याचे राहुलने फोटो शेअर करत सांगितले ( सौजन्य इंस्टाग्राम)

भारतीय क्रिकेट संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी इंग्लंडला पोहोचली आहे. या दौर्‍यावर टीम इंडियाला इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका देखील खेळायची आहे. भारतीय स्टार फलंदाज के एल राहुल ने गुरुवारी एक फोटो शेअर केला आहे. त्याबरोबर त्याने आपण इंग्लंडला पोहोचल्याचे सांगितले.

विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघ १८ जूनपासून न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपचा अंतिम सामना खेळणार आहे. हा सामना साऊदम्पटनच्या एजिस बाऊल मैदानावर खेळला जाईल. यानंतर टीम इंडिया ४ ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.

हेही वाचा- परदेशी खेळाडूंच्या पगारात कपात!

राहुलने शेअर केलेल्या फोटोला, क्रिकेटप्रेमींनी लाईक्स केले आहे. इंस्टाग्रामवर या फोटोला ५ लाखापेक्षा जास्त लोकांनी लाईक्स केले आहे. इंग्लंडमध्ये भारतीय संघाला आता क्वारंटाईन करण्यात येईल. यापुर्वी टीम इंडिया मुंबईत क्वारंटाईन मध्ये होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by KL Rahul (@rahulkl)

यापूर्वी बीसीसीआयने पुरुष आणि महिला क्रिकेट संघातील खेळाडूंचा फोटो शेअर केला होता, त्यामध्ये ते सर्व विमानतळावर बसलेले दिसले. बुधवारी हे खेळाडू लंडनला रवाना झाले होते. खास गोष्ट म्हणजे महिला आणि पुरुष क्रिकेट संघ एकाच विमानाने लंडनमध्ये पोहोचले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2021 4:13 pm

Web Title: team india reaches england photo shared by kl rahul srk 94
Next Stories
1 कोहली आणि शास्त्री यांचा ऑडिओ लीक, WTC फायनलचे करत होते नियोजन
2 वेगवान गोलंदाज रॉबिन्सनचा आक्षेपार्ह ट्विटनंतर माफीनामा!
3 मॉन्टी पानेसारनं उलगडलं क्रिकेटच्या देवाला तंबूत धाडायचं ‘गुपित’
Just Now!
X