News Flash

दिलशान विंडीजमधील तिरंगी स्पध्रेला मुकणार

श्रीलंकेचा धडाकेबाज सलामीवीर तिलकरत्ने दिलशानच्या पोटरीचे स्नायू गुरुवारी भारताविरुद्धच्या उपांत्य सामन्यात दुखावल्यामुळे त्याला फलंदाजी करताना माघारी परतावे लागले होते.

| June 22, 2013 03:13 am

दिलशान विंडीजमधील तिरंगी स्पध्रेला मुकणार

श्रीलंकेचा धडाकेबाज सलामीवीर तिलकरत्ने दिलशानच्या पोटरीचे स्नायू गुरुवारी भारताविरुद्धच्या उपांत्य सामन्यात दुखावल्यामुळे त्याला फलंदाजी करताना माघारी परतावे लागले होते. आता २८ जूनपासून वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या तिरंगी एकदिवसीय स्पध्रेतून दिलशानला माघार घ्यावी लागली आहे. श्रीलंकेच्या संघ प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, दिलशानला दुखापतीतून सावरण्यासाठी किमान चार ते आठ आठवडय़ांचा अवधी लागेल. दिलशानऐवजी बदली खेळाडूची घोषणा लवकरच करण्यात येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2013 3:13 am

Web Title: tillakaratne dilshan out of tri series in caribbean
टॅग : Sri Lanka
Next Stories
1 फिफा कॉन्फेडरेशन चषक फुटबॉल : दस का दम!
2 ब्राझील, इटली यांच्यात अव्वल स्थानासाठी चुरस
3 उरुग्वेची उपांत्य फेरीच्या दिशेने कूच
Just Now!
X