गेल्या महिन्याभरापासून जगभरातल्या फुटबॉलप्रेमींना करोनाचा किंवा त्यामुळे निर्माण झालेल्या ताणतणावाचा विसर पाडायला लावणारी युरो चषक फुटबॉल २०२० ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. त्यामुळे जगभरातल्या फुटबॉल प्रेमींची धडधड देखील वाढली आहे. त्यात पहिलीच सेमीफायनल अर्थात उपांत्य फेरीतील सामना हा स्पेन आणि इटली या दोन मातब्बर संघांमध्ये होणार असल्यामुळे सगळेच फुटबॉलप्रेमी काँटे की टक्कर बघायला मिळण्याच्या अपेक्षेने आज मध्यरात्रीनंतर आपल्या टीव्हीसेटसमोर बसणार आहेत. मात्र, हा सामना नेमका किती वाजता आणि कुठे बघायला मिळणार आहे असा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी आहे!

सामना कुठे खेळला जाणार?

Italy विरुद्ध Spain हा युरो चषक फुटबॉल स्पर्धेतला उपांत्य फेरीतील सामना लंडनच्या वेम्बली स्टेडियमवर रंगणार आहे.

इटली-स्पेन कधी भिडणार?

हा उपांत्य सामना ७ जुलै रोजी (भारतीय वेळेनुसार ६ जुलैच्या मध्यरात्री) खेळवला जाणार आहे.

किती वाजता पाहाता येणार सामना?

इटली विरुद्ध स्पेन या उत्कंठा शिगेला लावणारा सामना सुरू होण्याची भारतीय प्रमाणवेळेनुसार वेळ मध्यरात्री १२ वाजून ३० मिनिटे असेल.

कोणत्या चॅनल्सवर पाहता येणार सेमीफायनल?

गेल्या महिन्याभरापासून उत्सुकता लागलेला हा सेमीफायनलचा सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनल्सवर पाहाता येईल. यामध्ये सोनी टेन २ एसडी आणि एचडी, सोनी टेन ३ एसडी आणि एचडी-हिंदी या चॅनल्ससोबतच सोनी लिव, जिओ टीव्ही या मोबाईल अॅपवर देखील या सामन्याचं Live Telecast पाहाता येईल.

Euro Cup 2020 : फायनल गाठण्यासाठी इटली आणि स्पेनमध्ये रंगणार ‘दंगल’!

यूरो कपच्या बाद फेरीतील दोन्ही संघांमधील हा चौथा सामना असेल. यापूर्वी झालेल्या तीन सामन्यांत स्पेनने दोन वेळा विजय मिळवला आहे. २०१६च्या यूरो कपमधील अंतिम-१६ फेरीत इटलीने स्पेनला २-० ने हरवून स्पर्धेबाहेर केले होते. तर, २००८च्या उपांत्यपूर्व फेरीच्या पेनल्टी शूट आउटमध्ये स्पेनने प्रथमच इटलीला पराभूत केले. २०१२च्या यूरो कपच्या अंतिम सामन्यात स्पेनने इटलीला ४-०ने पराभूत करून विजेतेपद पटकावले होते.