टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय बॉक्सिंगपटूंची सुरुवात खराब झाली आहे. अनुभवी आणि पदकाची अपेक्षा असणारा विकास कृष्णनचा ऑलिम्पिक प्रवास संपला आहे. वेल्टर ६९ किलोग्राम वजनी गटाच्या अंतिम ३२ सामन्यात त्याला ०-५ असा पराभव स्वीकारावा लागला. त्याला जपानच्या सेव्हनरेट्स क्विन्की मेनसाह ओकाझावाने सहज पराभूत केले. विकास संपूर्ण सामन्यात कमकुवत आत्मविश्वासाने खेळताना दिसला. पहिल्या फेरीत पाचही पंचांनी जपानच्या ओकाझावाला १० गुण दिले, तर विकासला ९ गुण मिळाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुसर्‍या फेरीतही अशीच परिस्थिती राहिली. तिसर्‍या आणि अंतिम फेरीत विकासला फारसे काही करता आले नाही. त्यामुळे ऑलिम्पिकमधील त्याचा प्रवास संपुष्टात आला. हाय-व्होल्टेज सामन्यात २९ वर्षीय विकासला डाव्या डोळ्याखाली दुखापत झाली. संघाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खांद्याच्या दुखापतीसह तो मैदानात उतरला होता. उद्या रविवारी बॉक्सर मेरी कोम आणि मनीष कौशिक यांचे सामने होणार आहेत.

 

हेही वाचा – IND VS ENG : श्रीलंकेत धुमशान घालणारे मुंबईचे ‘हे’ दोन धुरंदर इंग्लंड गाठणार!

सामन्यादरम्यान ओकाझावाने शेवटपर्यंत वर्चस्व राखले. तो रिंगमध्ये फारच चपळ दिसला. त्याने दोन वेळचा ऑलिम्पियन विकासला अगदी सहज हरवले. २५ वर्षीय ओकाझावाने २०१९ च्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकले होते आणि त्याच वर्षी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. आता त्याचा सामना तिसऱ्या मानांकित क्युबाच्या रोनिएल इगलेसियासशी होईल. इगलेसिया २९१२ची ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता आणि माजी विश्वविजेताही आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tokyo olympics 2020 boxer vikas krishan eliminated from round of 32 mens welterweight category adn
First published on: 24-07-2021 at 17:50 IST