टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील १० मीटर एअर पिस्तूल शूटिंग स्पर्धेत भारताला मोठा धक्का बसला आहे. १० मीटर एअर स्पर्धेत भारताच्या सौरव चौधरीला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. या स्पर्धेत सौरभ सातव्या स्थानावर राहिला आणि पदकाला मुकला. यापूर्वी त्याने पात्रतेमध्ये जबरदस्त कामगिरी करून अंतिम सामन्यात स्थान मिळवले होते. या स्पर्धेत सौरभने ९८.६ गुण मिळवले आणि तो सातव्या क्रमांकावर गेला. ऑलिम्पिक स्पर्धेत प्रथमच सर्वात कमी वयाचा स्पर्धकाने सातवा क्रमांक मिळवणे हेसुद्धा आश्चर्यकारक मानले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सौरभने पात्रता फेरीत दमदार कामगिरी करत प्रथम स्थान पटकावत अंतिम फेरी गाठली होती. या दरम्यान त्याने एकूण ५८६ गुण मिळवले. तर भारताचा अभिषेक वर्मा ५७५ गुणांसह १७ व्या स्थानावर होता. सौरभ चौधरीने चमकदार कामगिरी करत सहा मालिकांमध्ये ९५, ९८, ९८, १००, ९८ आणि ९७ गुणांची कमाई केली होती.

२०१८ मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यापासून सौरभ चौधरीची कामगिरी सातत्यपूर्ण आहे. त्यामुळे ऑलिम्पिकमधील एकेरी स्पर्धेत मागे पडल्यानंतरही सौरभ चौधरीची मिश्र स्पर्धेत पदक जिंकण्याची आशा कायम आहे. १० मीटर एअर पिस्टल मिश्रित स्पर्धा २७ जुलै रोजी होईल. दोन पात्रतेच्या फेऱ्या होतील. मंगळवारी २७ जुलै रोजी सकाळी ५.३० वाजता शूटिंग स्पर्धा सुरू होईल ज्यात पहिली फेरी ही सौरभ चौधरी आणि मनु भाकर यांची असेल.

सौरभचे कुटुंबीय वाढवताय धीर

शनिवारी मेरठच्या सौरभच्या कामिगिरीमुळे निराशा जरी पसरली असली तरी अद्याप त्याच्या घरच्यांनी धीर सोडलेला नाही. १९ वर्षीय सौरभच्या मेहनतीवर संपूर्ण कुटुंबाचा विश्वास असल्याचे त्याचे वडील जगमोहन सिंग म्हणाले. सौरभच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार त्याच्या प्रत्येक कामगिरीने सर्वांना चकित केले आहे. त्यामुळे पुढील स्पर्धेत सौरभ नक्कीच पदक जिंकेल असे त्यांच्या कुटुंबियांनी म्हटले आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेत सौरभ पदक मिळवूनच येईल अशी आशा गावकऱ्यांनाही आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tokyo olympics 2020 sourabh chaudhary final 10m air pistol event india abn
First published on: 24-07-2021 at 17:03 IST