क्रिकेटचा हा अनिश्चिततांचा खेळ आहे. क्रिकेट सामन्यात कधी काय होईल हे सांगता येत नाही. समजा सामना सुरू असताना अचानक एखादा खेळाडू त्याच चेंडूने फुटबॉल खेळायला लागला, तर… नुकताच एक अशा प्रकारचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात गोलंदाज चेंडू हाताने पकडण्याऐवजी पायाने त्याचाशी फूटबॉल खेळताना दिसला. भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा याने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

व्हिडीओमध्ये गोलंदाजाने फलंदाजाला चेंडू टाकला, पण फलंदाजाने तो चेंडू अलगद खेळला. तो चेंडू जेव्हा गोलंदाजाकडे गेला, तेव्हा  मात्र त्याने तो चेंडू पायाने अडवला. इतकंच नव्हे तर त्याने तो चेंडू प्रसिद्ध फूटबॉलपटू रोनाल्डोसारखा पायानेच उडवला. तसेच  तो चेंडू जमिनीवर पडू न देता त्याने तो तसाच खांद्यावर घेतला आणि त्या चेंडूला लाथ मारली. तेवढ्या वेळात यष्टीरक्षकाने धावत येऊन तो चेंडू झेलला.

पहा व्हिडीओ –

 

View this post on Instagram

 

Bowler hai ya Cristiano Ronaldo??? #aakashvani #fun #football #cricket #7 #voiceover #commentary

A post shared by Aakash Chopra (@cricketaakash) on

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा याने हा व्हिडिओ शेअर करताना लिहीले आहे की हा गोलंदाज आहे की रोनाल्डो?यात रोनाल्डोचं स्पेलिंग लिहताना आकाश चोप्राने Ronald इतकंच लिहिले होते. त्यामुळं ट्रोलर्सने त्यांच्यावर निशाणा साधला. भरभर टायपिंग केल्यावर असं होतं अशा शब्दात आकाश चोप्राला नेटिझन्सने ट्रोल केले. पण त्यानंतर त्याने त्याची चूक सुधारली. या आधीहा त्यांच्या कमेंटमुळे तो अनेकवेळा ट्रोल झाला होता.