08 August 2020

News Flash

विराट कोहलीने कर्णधारासारखी वागणूक ठेवावी- मोहम्मद अझरुद्दीन

भारतीय संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरूद्दीन यांनी विराट कोहलीने स्टेडियमवर कर्णधारासारखी वागणूक ठेवावी असे म्हटले आहे.

| July 30, 2013 12:28 pm

भारतीय संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरूद्दीन यांनी विराट कोहलीने स्टेडियमवर कर्णधारासारखी वागणूक ठेवावी असे म्हटले आहे.
झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात कर्णधार कोहलीने बाद झाल्याच्या दिलेल्या निर्णयावरून पंचांवर नाराजी व्यक्त केली होती. सामना भारताने जिंकला होता. परंतु, विराट कोहलीच्या यावागणूकीवर मोहम्मद अझरुद्दीन नाराज झाले. ते म्हणाले, कोहलीकडे संपुर्ण भारतीय क्रिकेटरसिक भविष्यातील भारतीय संघाचा कर्णधार म्हणून बघतात त्यामुळे या युवा खेळाडूने स्टेडियमवर कर्णधारासारखी वागणूक ठेवली पाहीजे. कोहली उत्तम खेळाडू आहे यात काही शंका नाही परंतु, प्रत्येकवेळी स्वभावात आक्रमकपणा ठेवून चालत नाही. असेही अझरुद्दीन म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2013 12:28 pm

Web Title: virat kohli has to behave like a captain says mohammad azharuddin
Next Stories
1 मयप्पनला आमच्याकडून क्लीन चीट नाही- गुन्हे शाखा
2 पुन्हा केव्हा येणार हॉकीचे सुवर्णयुग ?
3 माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत बीसीसीआय येऊ शकते-मुदगल
Just Now!
X