04 March 2021

News Flash

२०१९ विश्वचषकासाठी महेंद्रसिंह धोनी संघात हवाच – सुनिल गावसकर

धोनी संघात असणं विराटसाठी फायद्याचं!

महेंद्रसिंह धोनी (संग्रहीत छायाचित्र)

आगामी विंडीज व ऑस्ट्रेलिया टी-२० दौऱ्यात बीसीसीआयच्या निवड समितीने महेंद्रसिंह धोनीला संघातून वगळलं. या निर्णयावर सोशल मीडियामधून चाहत्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. या निर्णयानंतर धोनीचं टी-२० मधलं करिअर संपुष्टात आलंय का या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला. इंग्लंडमध्ये होणाऱ्या २०१९ विश्वचषकासाठी धोनीने काय करावं हा निर्णय निवड समितीने धोनीवर सोपला आहे. मात्र भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी २०१९ विश्वचषकासाठी धोनी भारतीय संघात असणं गरजेचं असल्याचं म्हटलंय.

“२०१९ साली होणाऱ्या विश्वचषकासाठी महेंद्रसिंह धोनी संघात हवाच. विराटला धोनीची खूप गरज आहे, याबद्दल काहीच शंका नाही. क्षेत्ररक्षणातले बदल, गोलंदाजांना यष्टींमागून सल्ले देणं, डीआरएसचे निर्णय घेणं; या सर्व गोष्टी विराट कोहलीसाठी फायद्याच्या आहेत.” सुनिल गावसकरांनी धोनीला आपला पाठींबा दर्शवला.

अवश्य वाचा – तुला पर्याय शोधण्याची वेळ आली आहे! निवड समितीचा धोनीला सूचक इशारा

याचसोबत गावसकरांनी रोहित शर्माच्या कर्णधारपदाचं कौतुक केलं. अडचणीच्या काळात रोहित, अजिंक्यसारखे खेळाडू विराटच्या मदतीला आहेत. त्यामुळे याच कारणासाठी धोनीला टी-२० क्रिकेटमध्ये विश्रांती देण्यात आली असू शकते, धोनीला संघातून वगळण्याच्या निर्णयाबद्दल गावसकरांनी आपला अंदाज मांडला. संघ निवडीनंतर निवड समितीचे प्रमुख सुनिल गावसकर यांनी धोनीचं करिअर संपुष्टात आलेलं नाही असं म्हटलं होतं. त्यातचं २०१९ विश्वचषकासाठी उरलेला कमी वेळ लक्षात घेता धोनीला वगळून पंतला संघात स्थान देण्याचा धोका बीसीसीआय पत्करेल का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अवश्य वाचा – धोनीला संघातून वगळण्याचा निर्णय योग्यच !

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2018 1:56 pm

Web Title: virat kohli needs ms dhoni says sunil gavaskar
टॅग : Ms Dhoni,Sunil Gavaskar
Next Stories
1 IND vs WI : वर्ल्डकपसाठीच्या संघात कोणाचेही स्थान पक्के नाही : रोहित शर्मा
2 सानिया – शोएबचा मुलगा कोणता खेळ खेळणार? चाहत्यांना पडला प्रश्न
3 IND vs WI : वर्ल्डकपमध्ये ‘या’ खेळाडूचे स्थान पक्के, कोहलीने दिले संकेत 
Just Now!
X