News Flash

विराट कोहली की बाबर आझम? इंग्लंडचा फिरकीपटू म्हणतो…

तुम्हाला पटतंय का फिरकीपटूचं मत?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना कायमच रोमांचक असतो. या दोन देशांतील क्रिकेटपटूंची अनेकदा तुलना केली जाते. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि पाकिस्तानचा युवा खेळाडू बाबर आझम या दोघांच्या खेळाची आणि फलंदाजीची बहुतांश वेळा तुलना करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू टॉम मुडी याने ‘जर तुम्हाला विराट कोहली उत्तम फलंदाज वाटत असेल, तर तुम्ही बाबर आझमची फलंदाजी नक्की बघा’, असं मत व्यक्त केलं होतं. तर ‘विराटच सर्वोत्तम फलंदाज आहे. बाबर आझम त्याच्या आसपासही नाही’, असे मत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद युसूफ याने व्यक्त केलं होतं. त्यानंतर आता या दोघांत सर्वोत्तम कोण? याबाबत इंग्लंडचा फिरकीपटू आदिल रशीद याने मत मांडलं आहे.

“रोज-रोज नाही…”; धोनीच्या चपळाईला जेव्हा बांगलादेशी फलंदाज मात देतो…

“दोघांमध्ये सर्वोत्तम कोण हे सांगणं खरंच खूप कठीण आहे. जर तुम्ही सध्याच्या फॉर्मचा आणि आकडेवारीचा विचार केलात, तर अशा वेळी मी बाबर आझमला निवडेन. मी इथे सध्याच्या फॉर्मबद्दल बोलतोय हे साऱ्यांनी लक्षात घ्यायला हवं. आताच्या घडीला बाबर आझमचा फॉर्म हा खूपच झकास आहे. म्हणून मी त्याची निवड करतोय. पण क्रिकेटपटू म्हणून बोलायचे झाले तर हे दोघेही अतिशय प्रतिभावंत खेळाडू आहेत”, असं उत्तर आदिल रशीदने अ‍ॅट द क्रिज टीव्हीशी बोलताना दिलं.

‘या’ देशातल्या फॅन्सकडून अजिबात पाठिंबा मिळत नाही – रोहित शर्मा

विराट-बाबर तुलनेवर कोण काय म्हणाले?

विराट कोहलीची अनेकदा पाकिस्तानचा बाबर आझम याच्याशी तुलना केली जाते. त्याच्याबाबत बोलताना पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद युसूफ म्हणाला, “बाबर हा युवा खेळाडू आहे. त्याची खूप जण विराटशी तुलना करतात. पण सध्या तरी अशी तुलना करणं योग्य नाही. विराट हा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सर्वोत्तम आहे. तो अनन्यसाधारण क्रिकेटपटू आहे. विराटने बाबरपेक्षा खूप जास्त सामने खेळले आहेत. त्यामुळे त्यांची तुलना शक्य नाही.” तर एका कार्यक्रमात बोलताना टॉम मूडी म्हणाला, “गेल्या वर्षभरात बाबर आझमने अशी दमदार कामगिरी केली आहे की त्यातून तो नक्कीच खास स्थानावर पोहोचू शकेल. आपण नेहमी फलंदाजीत विराट कोहली कशाप्रकारे सर्वोत्तम आहे याची चर्चा करतो. जर तुम्हाला विराट कोहलीची फलंदाजी पाहायला आवडते, तर तुम्ही बाबर आझमची फलंदाजी नक्की पाहा. पुढच्या पाच ते दहा वर्षात बाबर आझम नक्कीच दशकातील पहिल्या पाच सर्वोत्तम फलंदाजांच्या यादीत असेल.”

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2020 5:10 pm

Web Title: virat kohli or babar azam spinner adil rashid gives answer vjb 91
Next Stories
1 त्यावेळी हरभजनला मारण्यासाठी हॉटेलच्या रुमवर गेला होता शोएब अख्तर
2 “रोज-रोज नाही…”; धोनीच्या चपळाईला जेव्हा बांगलादेशी फलंदाज मात देतो…
3 सचिनच्या द्विशतकी खेळीवर स्टेनने उभं केलं प्रश्नचिन्ह, म्हणाला पंचांमुळे सचिनला जीवदान
Just Now!
X