06 July 2020

News Flash

Instagram वरील सर्वात श्रीमंत खेळाडू, सर्वोत्तम १० जणांमध्ये विराट कोहलीला स्थान

HopperHQ.com संकेतस्थळाने जाहीर केली यादी

Instagram वरील सर्वात श्रीमंत खेळाडूंच्या यादीत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने सर्वोत्तम १० जणांमध्ये स्थान मिळवलं आहे. फुटबॉलपटूंचा भरणा असलेल्या या यादीत विराट कोहली हा एकमेव क्रिकेटपटू आहे. विराटने या यादीमध्ये ९ वं स्थान मिळवलंय. HopperHQ.com या संकेतस्थळाने ही यादी जाहीर केली आहे.

पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्तीआनो रोनाल्डो या यादीमध्ये पहिल्या स्थानावर आहे. सोशल मीडियावर खेळाडूंचे चाहते आणि त्यांची कमाई या निकषावर ही यादी जाहीर केली जाते. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ २०१९ विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत पोहचला होता.

इन्स्टाग्रामवरील सर्वात श्रीमंत खेळाडूंची यादी –

१) ख्रिस्तीआनो रोनाल्डो
२) नेमार
३) लायोनल मेसी
४) डेव्हिड बॅकहॅम
५) लेब्रोन जेम्स
६) रोनाल्डिनो
७) गॅरेथ बेल
८) झ्लाटान इब्राहमोविच
९) विराट कोहली
१०) लुईस सुआरेझ

अवश्य वाचा – ड्रेसिंग रुममध्ये प्रत्येकाला आपले विचार मांडण्याची मुभा – विराट कोहली

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2019 5:11 pm

Web Title: virat kohli the sole cricketer in instagrams rich list for 2019 psd 91
टॅग Virat Kohli
Next Stories
1 ड्रेसिंग रुममध्ये प्रत्येकाला आपले विचार मांडण्याची मुभा – विराट कोहली
2 IND vs WI : टीम इंडियामध्ये ‘हा’ खेळाडू हवा का?; ICC ने विचारला सवाल
3 गोड-तेलकट पदार्थ खाणं टाळा, टोकियो ऑलिम्पिकसाठी भारतीय महिला हॉकी संघाचा डाएट प्लान
Just Now!
X