भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला बीसीसीआयने विशेष रजा मंजूर केली आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा अंतिम सामना खेळल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होईल. या दौऱ्यात भारतीय संघ ३ वन-डे, ३ टी-२० आणि ४ कसोटी सामने खेळणार आहे. विराटची पत्नी अनुष्का शर्मा लवकरच आई होणार आहे. आपल्या पहिल्या बाळाच्या जन्मावेळी बायकोसोबत राहण्यासाठी विराटने बीसीसीआयकडे परवानगी मागितली होती.

अखेरीस बीसीसीआयने विराटची मागणी मान्य केली असून अ‍ॅडलेड कसोटीनंतर विराट भारतात परतणार आहे. ICC ने याबद्दलची माहिती दिली आहे.

असा आहे टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा कार्यक्रम –

पहिला वन-डे सामना – २७ नोव्हेंबर – सिडनी
दुसरा वन-डे सामना – २९ नोव्हेंबर – सिडनी
तिसरा वन-डे सामना – १ डिसेंबर – मनुका ओव्हल
———————————————————–
पहिला टी-२० सामना – ४ डिसेंबर – मनुका ओव्हल
दुसरा टी-२० सामना – ६ डिसेंबर – सिडनी
तिसरा टी-२० सामना – ८ डिसेंबर – सिडनी
————————————————————
पहिला कसोटी सामना – १७ ते २१ डिसेंबर – अ‍ॅडलेड (दिवस-रात्र)
दुसरा कसोटी सामना – २६ ते ३० डिसेंबर – मेलबर्न
तिसरा कसोटी सामना – ७ ते ११ जानेवारी २०२१ – सिडनी
चौथा कसोटी सामना – १५ ते १९ जानेवारी – गॅबा