भारताचा विवेक सागर प्रसाद याची ‘२०१९ मधील उदयोन्मुख आंतरराष्ट्रीय हॉकीपटू’ पुरस्कारासाठी निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाकडून (एफआयएच) सोमवारी विवेकच्या नावाची घोषणा करण्यात आली.

विवेकला सर्व राष्ट्रीय संघटनांकडून ५० टक्के, प्रसारमाध्यमांकडून २३ टक्के, चाहत्यांकडून १५.१ टक्के मते मिळाली होती. विवेकने हे यश मिळवताना अर्जेटिनाचा मायको कॅसेला आणि ऑस्ट्रेलियाचा ब्लेक गोव्हर्स यांना मागे टाकले. कॅसेला याला २२ टक्के मते आणि गोव्हर्सला २०.९ टक्के मते मिळाली.

Best Coworking Spaces in Pune
कार्यालयीन जागा सहकार्यात पुणे देशात आघाडीवर
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
president droupadi murmu presents bharat ratna awards at rashtrapati bhavan
राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान
Suresh Khade
सांगली : आंदोलनकर्त्या कामगारांना मंत्र्यांच्या मध्यस्थीने २०० कोटींची भरपाई

सर्वाचे आभार मानताना विवेक म्हणाला की, ‘‘माझ्यासाठी हा सर्वोच्च क्षण आहे. मला हा पुरस्कार मिळवून देण्यासाठी मते देणाऱ्या सर्वाचे आभार मानतो. मला या पुरस्कारामुळे मोठे प्रोत्साहन मिळाले आहे. देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे यश मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन. माझ्या संघातील सर्व वरिष्ठांचेही आभार मानतो.’’’