मॉस्को येथील प्रयोगशाळेत रशियातील काही खेळाडूंची द्रव्य-उत्तेजक चाचणींसंबंधी घेण्यात आलेले नमुने वेळेन पुरवले न गेल्यामुळे जागतिक द्रव्य विरोधी संस्थेच्या (वाडा) अ‍ॅथलिट समितीने पुन्हा एकदा रशियावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

वाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर याविषयी सविस्तर नमूद करण्यात आले आहे. ‘‘३१ डिसेंबर ही अखेरची तारीख उलटूनदेखील रशियाने खेळाडूंच्या द्रव्य उत्तजेक चाचणीचे नमूने आमच्याकडे सोपवले नसल्याने त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. तसेच रशियाला गैर-अनुपालन प्रमाणपत्र देऊन अ‍ॅथलिट्सलादेखील कठोर शिक्षा सुनावण्यात यावी.’’