News Flash

Video: आपण बाद झालोय यावर भारतीय फलंदाजाचा विश्वासच बसेना

बाद झाल्यानंतरही तो बराच वेळ क्रिझवरच उभा होता

झेलबाद

न्यूझीलंडमध्ये सध्या भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-२० मालिका सुरु आहे. मात्र त्याचबरोबर भारत अ विरुद्ध न्यूझीलंड अ संघादरम्यानही सराव सामने सुरु आहेत. याच संघांदरम्यान एकदिवसीय सराव सामन्यानंतर आता कसोटी सामने सुरु झाले आहे. क्रिस्टनचर्च येथे गुरुवारपासून या सराव कसोटी सामन्यांपैकी पहिला सामना सुरु झाला.

या सामन्यामध्ये भारतीय संघाची फलंदाजी गडगडल्याचे चित्र दिसले. संपूर्ण भारतीय संघ २१६ धावा करुन तंबूत परतला. भारतीय फलंदाजांपैकी केवळ शुभमान गील आणि कर्णधार हनुमा विहारी यांनीच चांगला खेळ केला. शुभमानने ८३ तर हनुमाने ५१ धावा केल्या. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ११९ भागीदारी केली. मात्र दोघांचा मैदानात ताळमेळ जुळलेला असतानाच हनुमा अगदी विचित्र पद्धतीने झेलबाद झाला.

झालं असं की न्यूझीलंडचा ऑफ स्पीनर कोल मॅककॉनीने हनुमाला गोलंदाजी करत होता. कोलने टाकलेल्या चेंडूवर हनुमाने स्वीप शॉर्ट मारला. मात्र हा चेंडू सीली मीड ऑनला उभ्या असणाऱ्या खेळाडूच्या पायावर लागून हवेत उडला. त्याचवेळी विकेटकीपरने प्रसंगावधान दाखवत हा चेंडू अचूक टिपला आणि हनुमा चांगला फटका खेळूनही झेलबाद झाला. तुम्हीच पाहा हा व्हिडिओ

आपण अशा विचित्र पद्धतीने बाद झालेलो आहोत यावर हनुमाचा विश्वासच बसत नव्हता. न्यूझीलंडचे खेळाडू हनुमा बाद झाल्याचा आनंद व्यक्त करत असतानाही तो क्रिजवरच उभा असल्याचे दिसले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2020 12:25 pm

Web Title: watch hanuma vihari gets out in a bizarre fashion in first unofficial test scsg 91
Next Stories
1 Ind vs NZ : मुंबईकर शार्दुल ठाकूर विजयाचा शिल्पकार, सुपरओव्हरमध्ये भारताची बाजी
2 चौथ्या टी-२० आधी यजमानांना धक्का, कर्णधार विल्यमसन दुखापतीमुळे संघाबाहेर
3 महाराष्ट्रात मी फिरायला कुठे जाऊ शकतो?? अजिंक्य रहाणेला हवी आहे तुमची मदत
Just Now!
X