२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर सुट्टीवर गेलेल्या महेंद्रसिंह धोनीने अखेरीस मैदानात पुनरागमन केलं आहे. विश्वचषकानंतर बराच वेळ धोनीच्या निवृत्तीबद्दलच्या चर्चांना उधाणं आलं होतं, मात्र धोनीने याबद्दल आपली अधिकृत भूमिका जाहीर केली नव्हती. धोनीच्या अनुपस्थितीत संघात स्थान मिळालेलं ऋषभ पंत चांगली कामगिरी करत नसल्याने अनेकदा धोनीला संघात परत बोलवा अशी मागणी सोशल मीडियावर होत असते.

या सर्व घडामोडींनंतर धोनीने गुरुवारी रांचीच्या मैदानावर सराव केला. धोनीच्या या सरावसत्राचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

निवड समितीने आता आगामी काळात धोनीचा संघासाठी विचार केला जाणार नाही हे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे धोनी आपल्या निवृत्तीबद्दल सुरु असलेल्या चर्चांना कधी पूर्णविराम देतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.