24 November 2020

News Flash

Video : चेहऱ्यावर जाऊ नका….मराठमोळ्या स्मृतीकडून भल्याभल्यांना लाजवेल अशी कामगिरी

चॅलेंजर टी-२० ट्रॉफीत स्मृतीच्या कामगिरीची चर्चा

भारतीय महिला संघाची क्रिकेटपटू स्मृती मंधाना ही तिच्या धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखली जाते. मात्र महिलांच्या टी-२० चॅलेंजर ट्रॉफीत भारत ब संघाकडून खेळताना स्मृतीने भल्याभल्या खेळाडूंनाही लाजवेल अशाप्रकारे हवेत उडी मारत एकहाती झेल टिपला.

भारत अ संघ फलंदाजी करताना, अनुजा पाटील सहावं षटक टाकत होती. देविका वैद्यने अनुजाच्या गोलंदाजीवर कव्हरचा फटका खेळला, मात्र स्मृतीने सीमारेषेच्या दिशेने जाणारा चेंडू हवेत उडी मारत एक हाती झेल टिपत देविका वैद्यला माघारी धाडलं…पाहा स्मृती मंधानाने घेतलेल्या या भन्नाट कॅचचा व्हिडीओ

सोशल मीडियावर स्मृती मंधानाच्या या भन्नाट कॅचचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. स्मृतीने आपल्या कुशल नेतृत्वाच्या जोरावर भारत ब संघाने टी-२० चॅलेंजर ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2020 1:30 pm

Web Title: watch smriti mandhana grabs a one handed stunner to dismiss devika vaidhya psd 91
टॅग Smriti Mandhana
Next Stories
1 ‘कॉफी विथ करण’ प्रकरणावर हार्दिकने अखेर सोडलं मौन, म्हणाला…
2 मी कधीच धोनीची जागा घेऊ शकत नाही – हार्दिक पांड्या
3 U-19 World Cup : अनिल चौधरींचा बहुमान, पंचांची भूमिका निभावणारे एकमेव भारतीय
Just Now!
X