News Flash

अजब-गजब रनआऊट! VIDEO पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू

तिसऱ्या पंचांनादेखील निर्णय द्यायला फार वेळ लागला

टी २० विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा बांगलादेशशी सामना सुरू आहे. शफाली वर्मा (३९) आणि जेमिमा रॉड्रीग्ज यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारतीय महिला संघाने २० षटकात ६ बाद १४२ धावा केल्या आणि बांगलादेशपुढे १४३ धावांचे आव्हान ठेवले.

T20 WC 2020 IND Vs BAN Live : बांगलादेशपुढे भले मोठे आव्हान

सामन्यात बांगलादेशची कर्णधार सलमा खातून हिने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. इन-फॉर्म सलामीवीर स्मृती मानधना हिच्या अनुपस्थितीत रिचा घोषला संघात स्थान मिळाले. स्मृती मानधना संघात नसल्याने यष्टीरक्षक तानिया भाटीया हिला सलामीवीर म्हणून बढती देण्यात आली, पण ती केवळ २ धावा करून माघारी परतली. धडाकेबाज फटकेबाजी करणारी शफाली पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अयशस्वी ठरली. १७ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकार खेचत तिने ३९ धावा केल्या आणि ती बाद झाली.

ट्रम्प यांनी केलं सचिन, विराटचं तोंडभरून कौतुक

भारत चांगली भागीदारी करताना दिसत असताना वाईडचा चेंडू मारताना कर्णधार हरमनप्रीत बाद झाली. तिने ११ चेंडूत ८ धावा केल्या. संयमी खेळी करणारी मुंबईकर जेमिमा रॉड्रीग्ज चोरटी धाव घेताना धावबाद झाली. ती ३७ चेंडूत ३४ धावा करून माघारी परतली आणि भारताला चौथा धक्का बसला. स्मृती मानधना हिच्या जागी संघात स्थान मिळालेली रिचा घोष मोठा फटका खेळताना झेलबाद झाली आणि भारताचा निम्मा संघ माघारी परतला. तिने १४ चेंडूत १४ धावा केल्या.

Video : स्मिथची ‘हवाई फिल्डिंग’! सीमारेषेवर षटकार जात असताना काय केलं पाहा…

त्यानंतर सामन्यात एक अत्यंत अजब-गजब असा रनआऊट पाहायला मिळाला. दोन्ही फलंदाज एकाच बाजूच्या क्रीजमध्ये धावल्या, त्यावेळी दुसऱ्या दिशेला खेळाडूने स्टंप उडवत एका फलंदाजाला बाद केले. या प्रकरणी तिसऱ्या पंचांची मदत घ्यावी लागली आणि बराच काळ व्हिडीओ पाहून अखेर दिप्तीला धावबाद ठरवण्यात आले. दिप्तीने ११ धावा काढल्या.

पाहा VIDEO

सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात वेदा कृष्णमूर्ती हिने ४ चौकारांसह ११ चेंडूत २० धावा केल्या आणि भारताला १४२ धावांचा टप्पा गाठून दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2020 7:05 pm

Web Title: watch weird funny run out in t20 world cup match india vs bangladesh veda krishanmurthy deepti sharma video vjb 91
Next Stories
1 सचिनमुळे डोनाल्ड ट्रम्प झाले क्लीन बोल्ड.., आयसीसीनं उडवली दांडी!
2 T20 WC 2020 : भारताकडून बांगलादेशचा धुव्वा; मिळवला सलग दुसरा विजय
3 ट्रम्प यांनी केलं सचिन, विराटचं तोंडभरून कौतुक
Just Now!
X