26 February 2021

News Flash

सचिनवर निवृत्तीचा निर्णय लादला नाही -शुक्ला

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून निवृत्त होण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने लादला असल्याचे वृत्त खोडसाळपणाचे आहे, असे मंडळाचे वरिष्ठ पदाधिकारी व आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी

| December 25, 2012 03:49 am

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून निवृत्त होण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने लादला असल्याचे वृत्त खोडसाळपणाचे आहे, असे मंडळाचे वरिष्ठ पदाधिकारी व आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी येथे सांगितले.
निवृत्त होण्याचा निर्णय सचिन याने स्वेच्छेने घेतला आहे. खेळाडूने केव्हा व कोणत्या सामन्यांमधून निवृत्त व्हावे हे आम्ही कधीही ठरवीत नसतो. मात्र त्याचा हा निर्णय त्याने योग्यवेळी घेतला आहे असे सांगून शुक्ला म्हणाले, आजपर्यंत मंडळाने कधीही व कोणालाही निवृत्त होण्याबाबतचा सल्ला दिलेला नाही. तसेच कधीही आम्ही खेळाडूंवर याबाबत दडपण आणलेले नाही. मंडळाच्या दडपणामुळे सचिनने हा निर्णय घेतला असल्याचे वृत्त केवळ आम्हास बदनाम करण्यासाठी पसरविण्यात आले आहे. निवृत्तीचा निर्णय घेण्याबाबत सचिनला कोणाच्या सल्ल्याची जरुरी नव्हती. तो हा निर्णय घेण्याबाबत अतिशय सामथ्र्यवान खेळाडू आहे.
शुक्ला म्हणाले, सचिनने भारतीय क्रिकेट क्षेत्रास गौरवशाली स्थान मिळवून देण्यात अतिशय महत्त्वाचा वाटा उचलला आहे. प्रत्येक खेळाडूला निवृत्ती स्वीकारणे अपरिहार्य असते. सचिनने योग्यवेळी निर्णय घेत आपला नावलौकिक आणखी उंचावला आहे.     

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2012 3:49 am

Web Title: we not smashed the retierment decision on sachin shukla
टॅग : Sachin Tendulkar,Sports
Next Stories
1 सचिनच्या निवृत्तीमुळे निवड समितीला दिलासा -प्रसन्ना
2 सचिनकडून भरपूर शिकलो -धोनी
3 सचिन हाच खरा अद्वितीय क्रिकेटपटू – जयसूर्या
Just Now!
X